लशीमुळे कोरोना थांबणार नाही, आजार पसरणारच; ब्रिटिश शास्त्रज्ञाचा दावा

corona vaccine main.jpg
corona vaccine main.jpg

लंडन- एकीकडे जगभरात कोरोना विषाणूवरील लशीवर काम केले जात आहे. अनेकांनी तर लस अंतिम टप्प्यात असल्याचे सांगून दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, ब्रिटनच्या एका मुख्य वैज्ञानिक सल्लागाराच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. सर पॅट्रिक वॉलेस यांच्या मते, लशीमुळे कोरोनाला रोखता येणार नाही. पुढील वर्षी मार्चपूर्वी लस मिळणारही नसल्याचे सांगत आतापर्यंत फक्त कांजण्यासारखा आजारच पूर्णपणे मिटवता आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

वॉलेस म्हणाले की, कोरोना विषाणूचा आजार हंगामी तापासारखा असू शकतो. कोरोनावरील लशीच्या संशोधनात आधीपेक्षा चांगली सुधारणा झाली आहे. परंतु, एक अशी लस तयार करणे जी मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचेल याबाबत सध्या साशंकता वाटते. परंतु, हा संसर्ग पूर्णपणे रोखेल अशी लस मिळेल, याची शक्यता कमी आहे. 

हा आजार पसरत जाईल आणि नंतर तो सर्वसाधारण होऊन जाईल, असे पॅट्रिक यांनी म्हटले. लशीकरणामुळे संसर्ग होण्याची शक्यता कमी होईल आणि विषाणूमुळे होणार्‍या आजाराची तीव्रता देखील कमी होईल. त्यानंतर तो सामान्य तापासारखा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुढील काही महिन्यांत हे स्पष्ट होईल की, ही लस संरक्षण पुरवू शकते किंवा नाही हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.

ज्यांच्यावर लशीची चाचणी करण्यात येत आहे. त्यातील बहुतांश जणांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढली आहे. परंतु, तिसऱ्या चाचणीनंतर ते संसर्ग रोखू शकतात की नाही, हे समजेल, असे त्यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com