स्वबळाच्या नाऱ्यावरुन आता राष्ट्रवादीनेही काँग्रेसला फटकारलं!

जयंत पाटील यांची केली राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट
Jayant Patil
Jayant Patil

मुंबई : शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त (Shiv sena anniversary) आयोजित ऑनलाइन कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेसला स्वबळाच्या नाऱ्यावरुन चांगलंच सुनावलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही काँग्रेसला यावरुन फटकारलं आहे. काँग्रेसनं शेवटपर्यंत स्वबळाचा नारा दिला तर राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र येईल, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वारंवार स्वबळाचा नारा दिला होता. (after Shiv Sena now NCP has also hit Congress with the slogan on self reliance)

Jayant Patil
प्रताप सरनाईकांच्या पत्रावर संजय राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया

माध्यामांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, "आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष वेगवेगळ्या ठिकाणी स्वबळाचा नारा देत असले तरी जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही तिघेही एकत्र राहू असं मला वाटतं. मी यापूर्वीही सांगितलं होतं की, जर काँग्रेस शेवटपर्यंत स्वबळाचा नारा देणार असेल तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही गोष्टीला एकत्र समोर जाईल."

Jayant Patil
राज्यात काँग्रेस स्वबळावर लढणार - नाना पटोले

नाना पटोले नक्की काय म्हणाले होते?

नाना पटोले गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणच्या दौऱ्यांवर असताना त्यांनी काँग्रेस आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची विधानं केली होती. दरम्यान, अकोला इथं एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी जाहीरपणे मुख्यमंत्री होण्याची इच्छाही व्यक्त केली होती. त्यांच्या विधानानंतर राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ माजला होता. शिवसेना आणि राष्ट्रवादीने यावर सावध भूमिका घेतली होती तर भाजपने राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. तसेच "राहुल गांधींना जसं पंतप्रधान व्हावसं वाटतं तसंच नाना पटोलेंना मुख्यमंत्री व्हावसं वाटतंय पण तसं जनतेला वाटतं नाही" अशा शब्दांत भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला होता.

Jayant Patil
स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसला उद्धव ठाकरेंचा अप्रत्यक्ष सल्ला; म्हणाले...

उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला काय दिला होता सल्ला?

दरम्यान, १९ जून रोजी शिवसेनेच्या वर्धापनदिनी ऑनलाइन पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारमधील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसला अप्रत्यक्षपणे सल्ले दिले. "सध्याच्या कोरोनाकाळात आपण राजकारण करता कमा नये कारण जनतेला सध्या आपल्या स्वबळाचं काही देणघेणं नाही. असा प्रयत्न केला तर जनता आपल्याला जोड्यानं मारेल" असा टोला ठाकरेंनी काँग्रेसला लगावला होता. तसेच "शिवसेना कुणाच्या पालख्या उचलणारी नाही, अन्यायाविरोधात लढणं हेच आमच्यासाठी स्वबळ असल्याचं" उद्धव ठाकरे म्हणाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com