शस्त्रसंधी संपताच चार दहशतवाद्यांना कंठस्नान

वृत्तसंस्था
सोमवार, 18 जून 2018

जम्मू-काश्मीर : रमजानच्या सणामुळे मागील महिनाभर जम्मू-काश्मिरमध्ये शस्त्रसंधी लागू करण्यात आली होती, पण ही शस्त्रसंधी संपताच भारतीय जवानांनी आक्रमक होत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. बंदीपुरा येथे सध्या भारतीय सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. आजही (ता. 18) ही चकमक सुरूच होती.

बिजबेहरा परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची भारतीय लष्कराला माहिती मिळाली होती. यावरून त्यांनी काही घरांना घेराव घालत पुढील कारवाई केली व दहशतवाद्यांना ठार केले. शस्त्रसंधी दरम्यान दहशतवाद्यांनी हल्ले वाढवले होते. तसेच 28 जून पासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचा विचार करून ही शस्त्रसंधी पुढे न वाढविण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला होता. 

लष्करानेही केंद्र सरकारला ही शस्त्रसंधी न वाढवण्याची विनंती केली होती. त्यामुळे रमजान पार पडताच ही शस्त्रसंधी थांबवण्यात आली व लष्काराने त्याच जोमाने दहशतवाद्यांना शोधून कंठस्नान घातले. 

Web Title: after stopping of cease fire 4 terrorist killed