esakal | भाऊही गेला; नातेवाईकांच्या हल्ल्याबाबत रैनाचे पंजाब सरकारला चौकशी करण्याचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

Suresh-Raina

पंजाबमधील पठाणकोठमध्ये भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या नातेवाईकांवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात त्याच्या काकांचा मृत्यू झाला होता. आता रैनाचा भाऊ जो रुग्णालयात उपचार घेत होता त्याचाही मृत्यूही झाला. या हल्ल्याची चौकशी करण्याची विनंती रैनाने पंजाब सरकारला केली आहे. याबद्दलचे दोन ट्विट रैनाने केले आहेत. ट्विट करत रैनानं लिहलं आहे की, माझ्या कुटुंबासोबत पंजाबमध्ये जे झालं ते भयावह होतं.

भाऊही गेला; नातेवाईकांच्या हल्ल्याबाबत रैनाचे पंजाब सरकारला चौकशी करण्याचे आवाहन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंजाबमधील पठाणकोठमध्ये भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या नातेवाईकांवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात त्याच्या काकांचा मृत्यू झाला होता. आता रैनाचा भाऊ जो रुग्णालयात उपचार घेत होता त्याचाही मृत्यूही झाला. या हल्ल्याची चौकशी करण्याची विनंती रैनाने पंजाब सरकारला  केली आहे. याबद्दलचे दोन ट्विट रैनाने केले आहेत. ट्विट करत रैनानं लिहलं आहे की, माझ्या कुटुंबासोबत पंजाबमध्ये जे झालं ते भयावह होतं. हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात माझ्या काकांचा मृत्यू झाला असून सध्या माझी आत्या गंभीर असून ती लाइफ सपोर्टवर आहे. या हल्ल्यात माझ्या भावांनाही मारहाण करण्यात आली होती. यामूळे माझ्या चुलतभावाचेही काल रात्री निधन झाले. त्या रात्री नेमकं काय घडलं ते आत्तापर्यंत आम्हाला समजलं नाही.  या प्रकरणाची लवकर चौकशी करावी.' अशी दोन ट्वीट करुन रैनाने पंजाब सरकारला मदतीचे आवाहन केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

टवाळखोरांनी केलेल्या हल्ल्यात रैनाची आत्या आणि त्याचा आते भाऊ देखील गंभीर जखमी झाले होते. आता त्याच्या भावचाही काल रात्री मृत्यू झाला. आता ही घटना सुरेश रैनाच्या नातेवाईकांशी संबंधित असल्याने पोलिसांवरील दबाव वाढण्याची शक्यता आहे. शनिवारी सुरेश रैनाने आयपीएलमधून माघार घेत मायदेशी परतला होता. या घटनेमुळेच त्याने स्पर्धेतून माघार घेतल्याची चर्चा सध्या रंगताना दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्स सध्या रैनाच्या कुटुंबियाशी पाठिशी ठाम उभी आहे.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

19 ऑगस्टच्या रात्री झाला होता हल्ला 
19 ऑगस्टच्या मध्यरात्री अडीचच्या सुमारास थरियाल गावात वास्तव्यास असलेल्या सरकारी ठेकेदार अशोक कुमार यांच्या घरावर टवाळखोरांनी हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छतावरुन घरात शिरलेल्या टोळीने बेसबॉल स्टीक, लोखंडी रॉडने रैनाचे काका आणि त्यांच्या कुटुंबियावर हल्ला केला. त्यानंतर त्यांनी घरातील दागिने आणि रोकड लंपास केली. सकाळी दूधवाला घरी आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस अधिकारी प्रभजोत यांनी संबंधित कुटुंबिय रैनाचे नातेवाईक असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय.

Edited By - Prashant Patil