..तर काँग्रेसवर ही वेळ आली नसती; आझादांच्या राजीनाम्यानंतर तिवारींनी पक्षाला दिला सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manish Tiwari advised the Congress party

'दोन वर्षांपूर्वी आमच्यापैकी 23 नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षाची स्थिती चिंताजनक असल्याचं सांगितलं होतं.'

..तर काँग्रेसवर ही वेळ आली नसती; आझादांच्या राजीनाम्यानंतर तिवारींनी पक्षाला दिला सल्ला

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी काल शुक्रवारी सोनिया गांधींना (Sonia Gandhi) पाच पानी पत्र लिहून पक्षाचा राजीनामा दिला. या राजकीय घटनेनंतर राज्यसभा खासदार मनीष तिवारी (Manish Tiwari) यांनी पुन्हा एकदा आपल्या पक्षाला सल्ला दिलाय.

पक्षाच्या स्थितीबाबत G-23 नं काँग्रेस सुप्रिमोला पत्र लिहिलं असतं, त्याकडं लक्ष दिलं असतं, तर आज अशी परिस्थिती उद्भवली नसती, असं त्यांनी म्हटलंय. त्याचवेळी तिवारींनी आपली भूमिका स्पष्ट करताना मी भाडेकरू नसून या पक्षाचा सदस्य असल्याचं म्हटलंय. तिवारी म्हणाले, "दोन वर्षांपूर्वी आमच्यापैकी 23 नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षाची स्थिती चिंताजनक असल्याचं सांगितलं होतं. ते गांभीर्यानं घ्यायला हवं होतं. त्या पत्रानंतर सर्व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला."

हेही वाचा: मुंडकं छाटायला मी काही जनावर नाही; निलंबित भाजप आमदाराची संतप्त प्रतिक्रिया

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना तिवारी पुढं म्हणाले, 1885 पासून अस्तित्वात असलेला काँग्रेस पक्ष आणि भारत यांच्यातील समन्वयात दुरावा निर्माण झाल्याचं दिसतं. याबाबत आत्मपरीक्षण आवश्यक होतं. मला वाटतं की, 20 डिसेंबर 2020 रोजी सोनिया गांधींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत ही परिस्थिती मांडली आली तर, ही वेळ आली नसती. याबद्दल स्पष्टीकरण देण्यास त्या सर्वोत्तम स्थितीत असतील, असं त्यांनी स्पष्ट केलं. ज्या व्यक्तीकडं वॉर्डाची निवडणूक लढवण्याचाही दर्जा नाही, तो एकेकाळी काँग्रेस नेत्यांचा चपरासी होता. तो आता पक्षाबद्दल ज्ञान देतो, त्याचं मला हसू येतं. मी या पक्षाला 42 वर्षे दिली आहेत. त्यामुळं आम्ही या संस्थेचे म्हणजेच काँग्रेसचे भाडेकरू नाही, तर आम्ही पक्षाचे सदस्य आहोत. आता तुम्ही आम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केलात तर ती वेगळी बाब आहे, असंही तिवारी म्हणाले.

हेही वाचा: Congress MLA : 'या' तीन काँग्रेस नेत्यांची आमदारकी धोक्यात; सभापतींनी बजावली नोटीस

Web Title: After The Resignation Of Ghulam Nabi Azad Manish Tiwari Advised The Congress Party

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..