मध्यप्रदेशात 'व्यापमं'नंतर आता आणखी एका गैरव्यवहार उघडकीस

After Vyapam Now another scandal exposes in MP
After Vyapam Now another scandal exposes in MP

भोपाळ : मध्यप्रदेशात हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. हा गैरव्यवहार सुमारे 3 हजार कोटी रुपयांचा असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ई-टेंडर गैरव्यवहारात काही खासगी कंपन्यांना फायदा पोहचविण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. 

मध्यप्रदेशात यापूर्वी व्यवसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) गैरव्यवहार झाल्याचे समोर आले होते. या परीक्षेत डमी उमेदवाऱ बसविण्याता आले होते. या गैरव्यवहाराची राज्यासह देशभरात चर्चा होती. हा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान सरकारवर टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. ई-टेंडरमध्ये गैरव्यवहार करण्यात आला. काही खाजगी कंपन्यांना याचा लाभ देण्यात आल्याचे समोर आले होते. 

ऑनलाइन प्रक्रियेत छेडछाड करत हा गैरव्यवहार करण्यात आला. हा गैरव्यवहार गेल्या अनेक वर्षांपासून होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा खुलासा मे महिन्यात झाला. जे अधिकारी या गैरव्यवहाराची चौकशी करत होते. या संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करण्यापासून दूर ठेवण्यात आले आणि दुसऱ्या अधिकाऱ्याला याबाबतचा तपास करण्याचे सांगितले. 

दरम्यान, मध्यप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच हा गैरव्यवहार उघडकीस आल्याने मुख्यमंत्री चौहान यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com