पाककडून गोळीबार तोफगोळ्यांचा मारा 

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 मे 2018

गोळीबारात अर्नियाचे सर्वाधिक नुकसान 
लोकांनी घेतला छावण्यांमध्ये आश्रय 
बड्या शैक्षणिक संस्थांनाही टाळे 
शैक्षणिक संस्था, इमारतींना छावण्यांचे रूप 
सीमावर्ती भागांत घुसखोरीचा धोका वाढला 

जम्मू - पाकिस्तानच्या सीमेवरील भारतविरोधी कारवाया वाढल्या असून, आज जम्मूतील कथुआ आणि सांबा या दोन जिल्ह्यांतील खेडी आणि चौक्‍यांना पुन्हा लक्ष्य करण्यात आले. पाकने केलेला बेछूट गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यात पाच नागरिक ठार झाले असून, अन्य नऊजण जखमी झाले आहेत. मागील सलग आठ दिवसांपासून पाकने आंतरराष्ट्रीय सीमेवर अघोषित युद्धच पुकारले असून, त्यांच्या लष्कराकडून सातत्याने भारतीय चौक्‍यांवर गोळीबार केला जात आहे. 

पाकिस्तानने आज सकाळी नऊच्या सुमारास सांबामध्ये गोळीबार करत तोफगोळे डागण्यास सुरवात केली होती. कथुआतील नागरी भागांनाही या वेळी लक्ष्य करण्यात आले. याच भागातील हिरानगर सेक्‍टरमध्ये पाकच्या गोळीबाराची तीव्रता अधिक होती, असे एका ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. या गोळीबारात जखमी झालेल्यांना नजीकच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

लोकांची सुरक्षित स्थळी धाव 

सीमावर्ती भागात वास्तव्यास असलेल्या शंभरपेक्षाही अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून, शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या भागातील तोफगोळ्यांचा मारा सुरूच होता. आर. एस. पुरा, अर्निया, जम्मूतील बिश्‍नाह, रामगड आणि सांबा सेक्‍टरमध्ये बुधवारी मध्यरात्रीपर्यंत तोफगोळ्यांचा मारा सुरूच होता, अशी माहिती स्थानिकांनी दिली. दरम्यान, मंगळवारीही पाकने केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात 20 नागरिक जखमी झाले होते. 

गोळीबारानंतर 

गोळीबारात अर्नियाचे सर्वाधिक नुकसान 
लोकांनी घेतला छावण्यांमध्ये आश्रय 
बड्या शैक्षणिक संस्थांनाही टाळे 
शैक्षणिक संस्था, इमारतींना छावण्यांचे रूप 
सीमावर्ती भागांत घुसखोरीचा धोका वाढला 

Web Title: again Firing from Pakistan in jammu kashmir