गोव्यात चर्चविरोधात चित्रफीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

प्रादेशिक आराखडा आणि नगर नियोजन प्राधिकरणे यासंदर्भातील आंदोलनाला चर्चने पाठिंबा दिल्यावर आता चर्च प्रत्येक गोष्टीला विरोधच करते अशी ध्वनीचित्रफीत व्हॉट्‌सअॅपच्या माध्यमातून फिरू लागली आहे. ही ध्वनीचित्रफीत 49 सेकंदांची आहे. 

पणजी : प्रादेशिक आराखडा आणि नगर नियोजन प्राधिकरणे यासंदर्भातील आंदोलनाला चर्चने पाठिंबा दिल्यावर आता चर्च प्रत्येक गोष्टीला विरोधच करते अशी ध्वनीचित्रफीत व्हॉट्‌सअॅपच्या माध्यमातून फिरू लागली आहे. ही ध्वनीचित्रफीत 49 सेकंदांची आहे. 

चर्च अशा शब्दांनी या चित्रफितीची सुरवात होते. त्यानंतर चर्चने कोकण रेल्वेला विरोध केला, चर्च मोप विमानतळाला विरोध करते, इंग्रजीचे समर्थन करून चर्च कोकणीतील शिक्षणालाही विरोध करते, चर्चने आयआयटीला विरोध केला, चर्चने पर्यटन बृहद आराखड्याला विरोध केला होता, असे संदेश पूरक छायाचित्रांसह येत जातात. चर्च पाठिंबा तरी कशाला देते असा प्रश्‍न या चित्रफितीच्या शेवटच्या टप्प्यात उपस्थित केला गेला. गोमंतकीया तुझी फसवणूक करून घेऊ नको, असे आवाहन या चित्रफितीच्या शेवटी करण्यात आले आहे.

Web Title: Against Goa Church Video have been Released