'मॉब लिंचिंग'विरोधात अनुराग कश्यप, रामचंद्र गुहा यांच्यासह 49 जण पुढे

वृत्तसंस्था
बुधवार, 24 जुलै 2019

-  जमावाकडून होणाऱ्या हिंसाचाराच्या (Mob Lynching) घटनांमध्ये देशभरात मोठी वाढ होत आहे.

नवी दिल्ली : जमावाकडून होणाऱ्या हिंसाचाराच्या (Mob Lynching) घटनांमध्ये देशभरात मोठी वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही याची दखल घेण्यात आली. संयुक्त राष्ट्रातही (UN) हा मुद्दा उपस्थित झाला आणि भारताकडून संविधानातील तरतुदींप्रमाणे काम करण्याची मागणी झाली. आता भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रातील 49 दिग्गजांनी हाच प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच मॉब लिंचिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

देशभरात जमावाने कायदा हातात घेत हत्या केल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामध्ये जय श्रीराम म्हणण्यास सक्ती, गोहत्या संशय यांसह इतरही कारणांचा समावेश आहे. तसेच अल्पसंख्यांकांना लक्ष्य करण्याचे प्रमाणही सर्वाधिक आहे. या दिग्गजांनीही हाच मुद्दा केंद्रस्थानी ठेऊन देशात होत असलेल्या मॉब लिंचिंगच्या घटनांवर गंभीर चिंता व्यक्त केली. पंतप्रधान मोदींना याबाबतचे पत्र लिहिले या पत्रात अनुराग कश्यप, मणिरत्नम, रामचंद्र गुहा आणि अदूर गोपालकृष्णन यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींच्या स्वाक्षरी आहेत.

पंतप्रधान मोदींनी लिहिलेल्या या पत्रात म्हटले आहे, की आपले संविधान भारत एक धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही प्रजासत्ताक राज्य असल्याचे सांगते. येथे सर्व धर्म, समूह, लिंग, जाती समान आहेत. म्हणूनच प्रत्येक नागरिकाला आपल्या संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे आनंदाने जगता यावे यासाठी मॉब लिंचिंगच्या घटना थांबवायला हव्यात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Against Mob Lynching in the Giants field; 49 letter to Modi including Anurag Kashyap, Ram Chandra Guha