'बेरोजगारी, महागाई अन् आर्थिक मंदीला पंतप्रधान मोदी, भाजप जबाबदार'

'भारत हा लोकशाही देश आहे. ती मोदींची जहागिरी नाही.'
Prime Minister Narendra Modi And BJP
Prime Minister Narendra Modi And BJP

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. लोकांच्या प्रश्नांवर बोलणे अपेक्षित असताना एकमेकांवर आरोप, धर्म यासह इतर मुद्दे प्रचारात आणले जात आहेत. सध्या सोशल मीडियावर #AgarBJPNaHoti हा हॅशटॅग टेंडिंगमध्ये आहे. ट्विटरवर एकूण ५७ हजारांपेक्षा अधिक लोकांनी हा हॅशटॅग ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) व भाजपचा समाचार घेतला आहे. राजेश कुमार म्हणतात, भारत हा लोकशाही देश आहे. मोदींची ती जहागिरी नाही. भाजप नसता तर भारत हा संसदीय लोकशाही, धर्मनिरपेक्ष आणि सहनशील, प्रागतिक आणि सुसंस्कृत, विकसनशील आणि समानता, प्रामाणिक आणि एकसंघ असता आणि जगाकडून आदर मिळाला असता, असा प्रश्न वेनिशा जी. किबा यांनी विचारला आहे. युसूफ नडवी म्हणतात, भाजप (BJP) नसती तर भारतीय अनियोजित नोटाबंदी, आर्थिक मंदी, बेरोजगारी, अतिमहागाई, कराचे ओझे, कोरोना काळातील गैरव्यवस्थामुळे मृत्यू झाले नसते. (AgarBJPNaHoti Hashtag Trending On Social Media, Netizens Registered Their Unhappiness)

Prime Minister Narendra Modi And BJP
नरेंद्र मोदी Cartoonist ; नवाब मलिकांनी उडवली खिल्ली

भाजपने भारताला तरुण मनांमध्ये द्वेष पसरुन तोडल्याचा घणाघाती टीका मधू यांनी मोदी व भाजपवर केला आहे. शिक्षण नाही, नोकऱ्या नाहीत तर भारतीय युवा वर्गाने हिजाबसाठी भांडा, असे शेख मुशरफ हे म्हणतात.

काहींनी कोरोनामुळे लावलेल्या लाॅकडाऊन काळातील विदारक छायाचित्रे शेअर करुन भाजपचा निषेध केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com