अग्नी-4 ची चाचणी यशस्वी

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जानेवारी 2017

 

बालासोर - भारताने आज दीर्घ पल्ल्याच्या अत्याधुनिक "अग्नी 4' या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी घेतली. बंगालच्या उपसागरात ओडिशाजवळ असलेल्या अब्दुल कलाम बेटांवरून रोड मोबाईल यंत्रणेद्वारे ही चाचणी घेण्यात आली.

 

बालासोर - भारताने आज दीर्घ पल्ल्याच्या अत्याधुनिक "अग्नी 4' या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी घेतली. बंगालच्या उपसागरात ओडिशाजवळ असलेल्या अब्दुल कलाम बेटांवरून रोड मोबाईल यंत्रणेद्वारे ही चाचणी घेण्यात आली.

"अग्नी 4'चा पल्ला चार हजार किलोमीटरचा आहे. युद्धसामग्री वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्रामध्ये अनेक नवीन तंत्रज्ञानाचा समावेश केला असल्याने हे जगभरातील अत्याधुनिक क्षेपणास्त्रांपैकी एक समजले जात आहे. संरक्षण दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षेपणास्त्रामधील यंत्रणेमध्ये एव्हिऑनिक्‍स तंत्रज्ञानाचा वापर केला असल्याने त्याची विश्‍वासार्हता वाढली आहे. क्षेपणास्त्रातील स्वदेशी बनावटीचे लेझर तंत्रज्ञान आणि मायक्रो नेव्हिगेशन सिस्टीम यांचीही चाचणी आज घेण्यात आली. "अग्नी 4' च्या यशस्वी चाचणीबद्दल "इस्रो'च्या शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचे अभिनंदन होत आहे.

इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. मध्यम पल्ल्याच्या अग्नी वर्गातील क्षेपणास्त्रांमधील हे चौथे क्षेपणास्त्र आहे. या पूर्वीची अग्नी-1, 2 आणि 3 या पूर्वीच लष्करात दाखल झाली आहेत. गेल्या महिन्यात अग्नी-5 चीही चाचणी झाली होती.

भारतीय शहरे टप्प्यात आणणाऱ्या चीनच्या क्षेपणास्त्रांना उत्तर म्हणून "अग्नी-4' कडे पाहिले जात आहे.

अग्नी - 4 ची वैशिष्ट्ये
- 4000 किमी : पल्ला
- 1 टन : युद्धसामग्री वाहून नेण्याची क्षमता
- जमिनीवरून जमिनीवर मारा

Web Title: agni-4 test successful