"अग्नी-5' लवकरच लष्करात दाखल होणार 

पीटीआय
सोमवार, 2 जुलै 2018

चीनलाही माऱ्याच्या टप्प्यात आणणारी "अग्नी-5' ही आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र यंत्रणा लष्करात समाविष्ट करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या क्षेपणास्त्रामुळे भारताच्या लष्करी सामर्थ्यात मोठी वाढ होणार आहे.
 

नवी दिल्ली: चीनलाही माऱ्याच्या टप्प्यात आणणारी "अग्नी-5' ही आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र यंत्रणा लष्करात समाविष्ट करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या क्षेपणास्त्रामुळे भारताच्या लष्करी सामर्थ्यात मोठी वाढ होणार आहे.

पाच हजार कि.मी.चा पल्ला आणि अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र लष्कराच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (एसएफसी) या विशेष तुकडीमध्ये समाविष्ट केले जाणार आहे. या क्षेपणास्त्र यंत्रणेच्या काही चाचण्या झाल्या असून. काही अद्याप बाकी आहेत. चीनची राजधानी बीजिंगसह शांघाय, हॉंगकॉंग अशी शहरे या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येऊ शकतात. 

Web Title: Agni 5 missile likely to be inducted soon