Agniveer Scheme : अग्निवीरांबाबत लष्कराने घेतला मोठा निर्णय! जर 'परमनंट' व्हायचं असेल, तर लग्न करता येणार नाही

Indian Army’s Latest Decision on Agniveer : कायमस्वरूपी सैनिक बनण्याच्या प्रक्रियेत शिस्त आणि नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे असेल असे लष्कराने स्पष्ट केले आहे.
Agniveer
Agniveeresakal
Updated on

Indian Army’s Latest Decision on Agniveer Marriage Rules : अग्निवीरांबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. २०२२ मध्ये सुरू झालेल्या या योजनेची पहिली तुकडी आता चार वर्षांची सेवा पूर्ण करणार आहे. या पार्श्वभूमीवर हजारो अग्निवीरांच्या भविष्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात येत होते, ज्यांचे उत्तर आता लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 कायमस्वरूपी सैनिक बनण्याच्या प्रक्रियेत शिस्त आणि नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे असेल असे लष्कराने स्पष्ट केले आहे. तसेच, कायमस्वरूपी कमिशनबाबत लग्नाबाबतचे नियम लष्कराने स्पष्ट केले असून, लष्कराच्या म्हणण्यानुसार, अग्निवीर त्यांच्या चार वर्षांच्या सेवेत लग्न करू शकत नाहीत. त्यांना डिस्चार्ज झाल्यानंतर लगेच लग्न करण्याची परवानगी दिली जाणार नाही. कायमस्वरूपी सेवेसाठी संपूर्ण निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आणि अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत अग्निवीरांनी अविवाहित राहावे.

चार वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर जून आणि जुलैमध्ये तब्बल २० हजारांहून अधिक अग्निवीरांना सेवानिवृत्त केले जाईल. तर या अग्निवीरांपैकी सुमारे २५ टक्के अग्निवीरांना त्यांच्या कामगिरी, लेखी परीक्षा आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या आधारे कायमस्वरूपी सैनिक म्हणून पुन्हा सैन्यात सामील केले जाणार आहे. मात्र  लष्कराने इशारा दिला आहे की या कालावधीत लग्न केलेले आढळलेले कोणतेही अग्निवीर कायमस्वरूपी सैनिक बनण्यास अपात्र ठरतील. अशा उमेदवारांना त्यांची कामगिरी काहीही असो, निवड प्रक्रियेतून वगळले जाईल.

Agniveer
Bangladesh Hindu journalist shot dead: बांगलादेशात आता भरबाजारात हिंदू पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या!

अग्निवीरांना साधारणपणे २१ व्या वर्षी भरती केले जाते आणि २५ व्या वर्षी त्यांना कामावरून जाते. त्यानंतर कायमस्वरूपी सैनिक बनण्याच्या प्रक्रियेला अंदाजे चार ते सहा महिने लागू शकतात. या कालावधीत, लष्कराचा असा विश्वास आहे की शिस्त राखणे आणि नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.

Agniveer
Why Mamata Banerjee Unmarried : ...म्हणून ममता बॅनर्जींनी अविवाहित राहण्याचा घेतला होता निर्णय?

केवळ पात्र आणि शिस्तबद्ध अग्निवीरच पात्र असतील. लष्कराने स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या अग्निवीरांनी त्यांचा चार वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केला आहे, त्यांचा रेकॉर्ड चांगला आहे आणि या कालावधीत अविवाहित राहिले आहेत तेच कायमस्वरूपी कमिशनसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com