Why Mamata Banerjee Unmarried : ...म्हणून ममता बॅनर्जींनी अविवाहित राहण्याचा घेतला होता निर्णय?

Mamata Banerjee’s personal life : जाणून घ्या, ममता बॅनर्जींच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबाबतची महत्त्वपूर्ण आणि सर्वांना उत्सुकता असणारी माहिती
Mamata Banerjee
Mamata Banerjeesakal
Updated on

Mamata Banerjee biography : देशाच्या राजकारणात कायमच चर्चेत राहणाऱ्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आज (५ जानेवारी) त्यांचा ७१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्त त्यांच्याबद्दलच्या महत्त्वाच्या आणि सर्वांना उत्सुकता असणाऱ्या, जसं की त्या अविवाहित का आहेत? त्यांची जात कोणती? त्यांच्या कुटुंबात कोण आहेत इत्यादी गोष्टी जाणून घेऊयात.

सर्वप्रथम ममता बॅनर्जींनी लग्न का केले नाही? असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. याचं कारण म्हणजे लग्न न करण्याचा निर्णय त्यांनी विचारपूर्वक घेतलेला आहे. त्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे की त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य राजकारण आणि समाजसेवेसाठी समर्पित करायचे आहे, म्हणून त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे. 

ममता बॅनर्जी जेव्हा फक्त १७ वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांचे वडील प्रोमिलेश्वर बॅनर्जी यांचे निधन झाले. कुटुंबाची जबाबदारी अचानक त्यांच्या खांद्यावर आली. ममता बॅनर्जी यांना हे समजले की लग्न आणि कौटुंबिक संबंध त्यांच्या राजकीय वचनबद्धतेला बाधा आणू शकतात. म्हणूनच, त्यांनी एकटे राहून लोकांसाठी काम करण्याचा पर्याय निवडला. निवडणूक प्रतिज्ञापत्रांमध्ये नेहमीच ममता बॅनर्जी अविवाहित असल्याचे नमूद केले आहे.

Mamata Banerjee
Attack on US Vice President Residence : मोठी बातमी! अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी.व्हान्स यांच्या वॉशिंग्टनमधील घरावर हल्ला

ममता बॅनर्जी या बंगाली ब्राह्मण समाजातून येतात. त्यांचा जन्म ५ जानेवारी १९५५ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांनी जोगमाया देवी महाविद्यालयातून इतिहासात पदवी प्राप्त केली आणि कलकत्ता विद्यापीठातून इस्लामिक इतिहासात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांनी वयाच्या १५ व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला होता. 

Mamata Banerjee
ONGC Gas Leak: आंध्र प्रदेशात ‘ONGC’ची गॅस गळती! अनेक ठिकाणी लागली आग

१९८४ मध्ये, वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी, ममता बॅनर्जी यांनी जाधवपूर मतदारसंघातून ज्येष्ठ डावे नेते आणि लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचा पराभव करून देशाचे लक्ष वेधून घेतले. काँग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर, ममता बॅनर्जी यांनी १ जानेवारी १९९८ रोजी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. २०११ मध्ये, त्यांनी ३४ वर्षांच्या डाव्या सरकारला सत्तेवरून काढून टाकून इतिहास रचला आणि पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com