Agniveer Yojana : अग्निवीर योजना बंद करावी

राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील कीर्ती चक्र विजेते कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या कुटुंबीयांची मंगळवारी भेट घेतली. येथील सरकारी अतिथीगृहामध्ये सिंह यांच्या कुटुंबीयांनी राहुल यांची भेट घेतली.
Agniveer Yojana
Agniveer Yojana sakal
Updated on

रायबरेली : राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील कीर्ती चक्र विजेते कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या कुटुंबीयांची मंगळवारी भेट घेतली. येथील सरकारी अतिथीगृहामध्ये सिंह यांच्या कुटुंबीयांनी राहुल यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना सिंह यांच्या मातोश्रींनी अग्निवीर योजनेविरोधात मत मांडले आहे.

‘‘सरकारने लष्कराची दोन श्रेणींमध्ये विभागणी करू नये,’’ असे मत सिंह यांच्या मातोश्रींनी मंजू सिंह यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. अग्नीवर योजनेच्या माध्यमातून भरती झालेल्या जवानांना त्यांचा चार वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील करिअर करणे अवघड होऊ शकते असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.

चार वर्षांनंतर त्यांच्या मानसिकतेवर आणि शारीरिक तंदुरुस्तीवरही परिणाम झाल्याने ते नवे शिक्षण घेऊन त्यांचे करिअर नव्याने सुरू करू शकत नाहीत ही बाब अजिबात योग्य नाही, असे सिंह म्हणाल्या. या भेटीदरम्यान राहुल गांधी यांनी रायबरेलीतील एम्सला भेट दिली त्याचप्रमाणे त्यांनी येथील कार्यकर्त्यांशी आणि स्थानिक नागरिकांशीही संवाद साधला. सरकारने अग्निवीर योजना बंद करावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे राहुल यांनी यावेळी सांगितले.

कीर्ती चक्र विजेते कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या मातोश्रींची मागणी

राहुल गांधींकडून मंदिरात प्रार्थना

रायबरेली : उत्तर प्रदेशातील रायबरेली या आपल्या लोकसभा मतदारसंघातील चुरवा येथील हनुमान मंदिरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी प्रार्थना केली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते असलेल्या राहुल गांधी यांनी रायबरेलीला जात असताना मार्गावर असलेल्या चुरवा येथे हनुमान मंदिरात दर्शन घेतले. त्याचप्रमाणे, आपल्या दिवसभराच्या दौऱ्यात ते पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधतील, अशी माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.