दारूच्या ठेक्यावर कारवाई करायला पोलीस गेले, प्यायला गेलेल्यानं कार वेगात पळवली; ५ जणांचा चिरडून मृत्यू, अनेकजण जखमी

भरधाव कारने चिरडल्यानं घराबाहेर बसलेल्या पाच जणांचा मृत्यू झालाय. तर अनेक जण जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशातील आग्रा इथं घडलेल्या या अपघातानंतर रस्त्यावर उतरलेल्या जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.
Agra Car Mishap Five Dead After Driver Speeds Away During Liquor Shop Police Action

Agra Car Mishap Five Dead After Driver Speeds Away During Liquor Shop Police Action

Esakal

Updated on

भरधाव टाटा नेक्सॉन कारनं धडक दिल्यानं आग्र्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत.शुक्रवारी रात्री आग्र्यातील नगला बुढी इथं हा अपघात झाला. कारने दुचाकीस्वाराला धडक दिल्यानंतर आरडाओरडा झाला. त्यानंतर कार रस्त्याकडेलाच एका घराबाहेर बसलेल्या लोकांच्या दिशेनं गेली. यात चिरडून पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com