esakal | डॉक्टरने युवतीच्या हत्येचा खुलासा व्हिडिओमधून केला...
sakal

बोलून बातमी शोधा

agra dr yogita gautam case video viral dr vivek tiwari

सरोजिनी नायडू मेडिकल कॉलेजमध्ये एमडी करणाऱ्या डॉक्टर योगिता गौतम या युवतीची निर्घृण हत्या झाली होती. पण, एका डॉक्टरने आपण तिचा खून केला असल्याचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

डॉक्टरने युवतीच्या हत्येचा खुलासा व्हिडिओमधून केला...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

आग्रा (उत्तर प्रदेश): येथील सरोजिनी नायडू मेडिकल कॉलेजमध्ये एमडी करणाऱ्या डॉक्टर योगिता गौतम या युवतीची निर्घृण हत्या झाली होती. पण, एका डॉक्टरने आपण तिचा खून केला असल्याचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. यानंतर पोलिसांनी डॉ. विवेक तिवारी याला ताब्यात घेतले आहे.

'बाप' नावाचा माणूस सोशल मीडियावर व्हायरल...

योगिता आणि विवेक 7 वर्षांपासून रिलेशनमध्ये होते. विवेकला योगितासोबत लग्न करायचे होते. पण, योगिताला त्याच्यासोबत संबंध ठेवायचे नव्हते. यावरून दोघांमध्ये वाद होत होते. योगिताचा भाऊ डॉ. मोहिंदर कुमार गौतम यानेही पोलिसांना विवेक लग्नासाठी दबाव टाकत माहिती दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी अपहरण, हत्या केल्याप्रकरणी विवेक तिवारीवर गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये योगिताची हत्या कशी केली याचा खुलासा तिवारीने केला आहे. सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. पण, व्हिडिओमधून त्याने हत्या कशी केली याबाबत सांगितले आहे. त्याने सांगितले की, 'मंगळवारी संध्याकाळी आम्ही भेटलो आणि त्यानंतर एकत्र मोटारीमधून गेलो. तशी ती माझ्यावर आधीच नाराज होती. मात्र, मोटारीमध्ये आमच्यातील वाद वाढत गेला आणि संतापाच्या भरात मी तिचा गळा आवळला. गळा दाबूनही योगिताने प्राण सोडले नाहीत, असे मला वाटले. माझ्या मोटारीमध्ये एक चाकू कायम असतो मी तो चाकू काढून योगिताच्या डोक्यावर जोरात वार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मोटार निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तिचा मृतदेह झुडुपात लपवला आणि त्यावर लाकडं ठेवून मी तिथून निघालो.'

भिक्षेतून मिळवलेली रक्कम कोरोना रुग्णांसाठी दान...

loading image
go to top