Durga Visarjan Tragedy : दसऱ्याच्या उत्सवाला गालबोट, दुर्गादेवीचे विसर्जन करताना ६ तरुण बुडाले, दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ

Agra Youths Drowned : आग्रा जिल्ह्यातील डुंगरवाला गावात दुर्गा मूर्ती विसर्जनादरम्यान मोठा अपघात घडला.सात तरुण नदीत उतरले असता सहा जण बुडाले, एकाला वाचवण्यात आले.नदीच्या प्रचंड प्रवाहामुळे तरुणांना वाहून नेले गेले.
People gathered near the riverbank in Agra as police and locals carried out rescue operations after six youths drowned during Durga idol immersion.

People gathered near the riverbank in Agra as police and locals carried out rescue operations after six youths drowned during Durga idol immersion.

esakal

Updated on

Summary

  1. घटनेनंतर गावात व परिसरात हळहळ आणि आक्रोश पसरला.

  2. पोलीस आणि स्थानिकांनी मिळून बचावकार्य सुरू केले आहे.

  3. डीसीपी अतुल शर्मा यांनी सांगितले की विसर्जनासाठी नदीकाठावर वेगळी जागा निश्चित केली होती.

उत्तरप्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील एका गावात नदीत दुर्गा मूर्ती विसर्जनादरम्यान गुरुवारी दुपारी एक मोठा अपघात घडला. दुर्गा मूर्ती विसर्जन करण्यासाठी नदीत उतरलेले सात जण बुडाले, त्यामुळे एक खळबळ उडाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. एका तरुणाला नदीतून बाहेर काढण्यात आले, तर बुडालेले सहा जण बेपत्ता आहेत. कुटुंबातील सदस्य नदीतील दुर्गा मूर्तीसमोर त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहेत. बचावकार्य सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com