ऑगस्टा वेस्टलॅण्ड; एस. पी. त्यागींना जामीन

वृत्तसंस्था
सोमवार, 26 डिसेंबर 2016

भारताने 2010 मध्ये फिनमेनिका समूहाची उपकंपनी असलेल्या ऑगस्टाकडून 12 हेलिकॉप्टरची खरेदी केली होती. या व्यवहारात लाचखोरी झाल्याचा आरोप आहे.

नवी दिल्ली - ऑगस्टा वेस्टलॅण्ड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर गैरव्यवहार प्रकरणी माजी हवाईदल प्रमुख एस. पी. त्यागी यांना पटियाळा हाऊस न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

या प्रकरणातील सर्व पुरावे हे कागदोपत्री असून ते गुन्हे अन्वेषणने (सीबीआय) जप्त केले असल्याने मला जामीन मिळावा, अशी मागणी माजी हवाई दल प्रमुख एस. पी. त्यागी यांनी केली होती. त्यानुसार आज झालेल्या सुनावणीत त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयाने या प्रकरणातील सुदीप त्यागी आणि गौतम खेतान यांच्या जामीनावरील सुनावणी 4 जानेवारीपर्यंत राखून ठेवली आहे. तोपर्यंत त्यांना कोठडीतच रहावे लागणार आहे.
 
भारताने 2010 मध्ये फिनमेनिका समूहाची उपकंपनी असलेल्या ऑगस्टाकडून 12 हेलिकॉप्टरची खरेदी केली होती. या व्यवहारात लाचखोरी झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा फैरी झडत आहेत.

Web Title: AgustaWestland Case: SP Tyagi granted bail by Patiala House Court