खुद्द टिपू सुलतानाने अहिल्याबाईंना तत्वज्ञ राणी म्हणून उपमा दिली l Ahilyabai Holkar Jayanti 2023 Mandir Jirnoddhar punyashlok | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahilyabai Holkar Jayanti 2023

Ahilyabai Holkar Jayanti 2023 : खुद्द टिपू सुलतानाने अहिल्याबाईंना तत्वज्ञ राणी म्हणून उपमा दिली

Mandir Jirnoddhar By Ahilyabai Holkar : कुलीन शालीन स्त्री प्रमाणे डोक्यावर साधा पदर घेऊन मुघलांनाही चकीत करणारी ही महाराणी म्हणजे देशभरात तत्वज्ञ महाराणी म्हणून ओळखली जात. त्यांनी आपल्या स्त्री कतृत्वाने भल्या भल्यांना तोंडात बोटं घालायला लावली.

त्यांनी आपल्या कार्याने मुघल राजांनाही चकीत केलं. खुद्द टिपू सुलतानाने त्यांना तत्वज्ञ राणी म्हणून उपमा दिली त्यांनी अहिल्याबाईंच्या कार्यात बाधा आणली नाही. अशा थोर अहिल्याबाई होळकरांची आज पुण्यतिथी आहे.

जेव्हा आपण देशभरातल्या प्रमुख मंदिरांच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा इतिहास पाहतो तेव्हा त्यात अहिल्याबाईंच्या नावाचा उल्लेख समोर येतोच.

अहिल्याबाईंचा जन्म बीड जिल्ह्यातल्या चौंडी या गावी झालाय धनगर समाजात जन्म झालेल्या अहिल्याबाईंचा विवाह वयाच्या आठव्या वर्षीच सुभेदार मल्हारराव होळकर यांच्याशी झाला.

भारतावर अनेक परकीय आक्रमण झाले आहेत. अनेक राजांनी इथल्या मंदिरांची नासधूस केली आहे. गझनीच्या मोहम्मगने आक्रमण करूम गुजरातच्या सोमनाथ मंदिराची फार मोठ्या प्रमाणात नासधूस केली होती. औरंगजेबाने १६६९मध्ये काशीविश्वनाथ मंदिराचा विध्वंस केला होता. त्या जागी मशीद बांधली. १७०१ मध्ये औरंगजेबाने सोमनाथ मंदिर परत असे फोडले की ते परत बांधताच येणार नाही.

हा इतिहास माहित असतानाही अहिल्याबाईंनी मंदिराच्या जिर्णोध्दाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. यात कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत यांची खबरदारी त्यांनी घेतली. देशभरातले १२ ज्योतिर्लिंग आणि इतर मंदिरांच्या जीर्णोद्धाराचं काम त्यांनी हाती घेतलं. त्यांनी धर्मांध न होताही सर्व हिंदूंना त्यांच हे धार्मिक वैभव परत मिळवून दिलं.

काशीचा मुख्य घाट समजला जाणारा मणीकर्णिका घाटही अहिल्यादेवींनीच बांधला आहे. काशी विश्वनाथ आणि सोमनाथ मंदिराच्या उभारणीच्या वेळी तिथे मुस्लिम राजे राज्य करत होते. पण अहिल्यादेवींच्या मुत्सद्दीपणानं त्या राजांनीही या हिंदू मंदिरांना साधा स्पर्शही केला नाही.

अहिल्यादेवींनी मंदिरांच्या जीर्णोद्धाराबरोबर देशातल्या विविध राज्यांतील मंदिरं, घाट, रस्ते, धर्मशाळा आणि बारवांच्या माध्यमातून जोडण्याचं भव्यदिव्य कामही केलं. त्यांच्या याच कार्याचा सन्मान म्हणून त्यांनी पुण्यश्लोक या उपाधीनेही संबोधण्यात आलं होतं.

भारत सरकारनेही त्यांच्या याच कार्याचा गौरव केला. त्यांच्या नावे टपाल तिकीटही काढण्यात आले. शिवाय अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने भारत सरकार पुरस्कारही देते.