
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणावरून देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय.
शिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; असदुद्दीन ओवैसींच्या प्रवक्त्याला अटक
गेल्या काही दिवसांपासून बनारसमधील (वाराणसी) ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणावरून (Gyanvapi Masjid Survey) देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. सोमवारी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आलाय. तर, दुसरीकडं सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण पूर्ण झालं नसल्याचं सांगितलंय.
वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांना शिवलिंगावर भाष्य करणं चांगलंच महागात पडलंय. AIMIM चे प्रवक्ते आणि नेते दानिश कुरेशी (Danish Qureshi) यांना अहमदाबादच्या सायबर क्राइम ब्रँचनं (Cyber Crime Branch Ahmedabad) अटक केलीय. दानिश कुरेशी यांनी शिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती.
एआयएमआयएमचे प्रवक्ते दानिश कुरेशी यांनी सोशल मीडियावर (Social Media) शिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. यानंतर विश्व हिंदू परिषदेनं त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. वास्तविक, नुकतेच वाराणसी सत्र न्यायालयाच्या (Varanasi Sessions Court) आदेशानंतर ज्ञानवापी मशिदीचं सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणाच्या शेवटच्या दिवशी हिंदू पक्षानं आवारात शिवलिंग सापडल्याचा दावा केला होता. यानंतर न्यायालयानं ही जागा सील करण्याचे आदेश दिले होते. मात्र, शिवलिंग मिळाल्याचा दावा मुस्लीम पक्ष सातत्यानं फेटाळत आहे. ते शिवलिंग नसून कारंजे असल्याचं मुस्लिम बाजूचं म्हणणं आहे. जे जवळपास प्रत्येक मशिदीत बसवलं जातं, असंही त्यांचं म्हणणं आहे.
हेही वाचा: ज्ञानवापी-टीपू सुलतान मशिद प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम बोर्डाची तातडीची बैठक
तर, दुसरीकडं हिंदू पक्षाच्या या दाव्यानंतर सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू झालीय. या दाव्याच्या समर्थनार्थ अनेक लोक पोस्ट लिहित आहेत. त्यामुळं या दाव्यालाही अनेक जण विरोध करत आहेत. परंतु, यावेळी आक्षेपार्ह कमेंटही केल्या जात आहेत. अशीच कमेंट एआयएमआयएमचे प्रवक्ते दानिश कुरेशी यांनी केल्यामुळं पोलिसांनी त्यांना अटक केलीय.
Web Title: Ahmedabad Aimim Spokesperson Danish Qureshi Arrested Over Objectionable Comment On Kashi Gyanvapi Varanasi Court
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..