esakal | Corona Virus : अहमदाबादमध्ये तीन दिवसांचा कर्फ्यू; शाळा सुरु करण्याचाही निर्णय देखील रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

gujrat corona

गुजरात राज्य सरकारने 23 नोव्हेंबर पासून शाळा-कॉलेजेस उघडण्याचा निर्णय देखील मागे घेतला आहे. 

Corona Virus : अहमदाबादमध्ये तीन दिवसांचा कर्फ्यू; शाळा सुरु करण्याचाही निर्णय देखील रद्द

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

अहमदाबाद : दिल्लीप्रमाणेच अहमदाबादमध्येदेखील कोरोना व्हायरसचे आकडे वाढतत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाला वेळीच आळा घालण्यासाठी म्हणून गुजरात सरकारने पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. 20 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबरपर्यंत हा कर्फ्यू असणार आहे. या दरम्यान दूध आणि औषधांची दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी असणार आहे. यासोबतच राज्य सरकारने शाळा-कॉलेजेस 23 नोव्हेंबर पासून उघडण्याचा निर्णय देखील मागे घेतला आहे. 

हेही वाचा - Corona : कधी येईल लस आणि काय असेल किंमत; 'सीरम'चे आदर पूनावाल यांनी दिली माहिती
तर कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ३०० डॉक्टर्स आणि मेडिकलच्या ३०० विद्यार्थ्यांना सज्ज राहण्यास सांगण्यात आलं आहे. त्याच बरोबर २०  रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आल्या आहेत. शहरातल्या सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्समधले बेड्स वाढविण्यात आले आहेत.

गुजरातच्या अहमदाबाद शहरात कोरोना व्हायरसच्या संक्रमणास रोखण्यासाठी शुक्रवारपासून 57 तासांचा कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे.  तसेच गंभीर परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा आणि कॉलेजेस सुरु करण्याचा निर्णयदेखील मागे घेण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी म्हटलं की अहमदाबाद शहरात शुक्रवारी रात्री नऊ वाजल्यापासून कर्फ्यू सुरु होईल. हा कर्फ्यू सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत राहिल. अतिरिक्त मुख्य सचिव राजीव कुमार गुप्ता यांनी म्हटलंय की, 'संपूर्ण कर्फ्यू'च्या दरम्यान फक्त दूध आणि औषधांची दुकाने सुरु राहतील. 

हेही वाचा - VIDEO : हत्तीण पडली मोठ्या विहरीत; 16 तासांच्या अथक प्रयत्नानंतर काढलं बाहेर​
गुजरातमध्ये परिस्थिती गंभीर
गुजरातमध्ये गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसचे नवे 1,340 रुग्ण सापडले आहेत. यासोबतच राज्यातील संक्रमितांची एकूण संख्या 1,92,982 झाली आहे. आरोग्य विभागाने जाहिर केल्याप्रमाणे,राज्यात आणखी सात रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या वाढून 3,830 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत 1,76,475 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 70.33 लाखाहून अधिक चाचण्या केल्या गेल्या आहेत.

loading image