Ahmedabad Dowry Harassment Case
sakal
Summary
अहमदाबाद जिल्ह्यातील खेडा गावात सासरच्यांनी सुनेच्या धाकट्या बहिणीला हुंड्यात मागितल्याची धक्कादायक घटना.
विवाहित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून तिचा विवाह डिसेंबर 2024 मध्ये झाला होता.
सासरच्यांनी तिच्या धाकट्या बहिणीचे लग्न दिराशी लावण्यासाठी दबाव आणला.
Dowry Case: अहमदाबादच्या खेडा जिल्ह्यातून एक लाजिरवाणी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. तुम्ही लोकांना हुंडा म्हणून पैसे आणि गाड्या मागताना पाहिले असेल, परंतु येथील एका गावात सासरच्यांनी त्यांच्या सुनेच्या धाकट्या बहिणीलाच हुंड्यात सासरी घेऊन येण्याची म्हणून मागणी केली. एका २३ वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे की तिच्या सासरच्यांनी त्यांच्या अविवाहित धाकट्या मुलासाठी तिच्या धाकट्या बहिणीच हुंडा म्हणून मागितली आहे.