Ahmedabad Plane crash : अपघातग्रस्त विमानात माजी मुख्यमंत्री विजय रुपानी? बोर्डिंग पास सोशल मीडियावर व्हायरल

Ahmedabad Plane crash : पंतप्रधान कार्यालयाने प्रवाशांची यादी मागविली आहे. या विमान दुर्घटनेत मोठी हानी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या विमानात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी होते अशी माहिती मिळतेय.
Visual shows the crash site of an Ahmedabad-London international flight that met with an accident just 7 minutes after takeoff. Former Gujarat CM Vijay Rupani was reportedly among the passengers.
Visual shows the crash site of an Ahmedabad-London international flight that met with an accident just 7 minutes after takeoff. Former Gujarat CM Vijay Rupani was reportedly among the passengers. esakal
Updated on

अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात झाला आहे. एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान अहमदाबादमधील मेघानीनगरलमध्ये कोसळले आहे. त्यात २४२ प्रवासी होते. ते लंडनला उड्डाण करत होते. असे सांगितले जात आहे की उड्डाणानंतर स्फोट झाला तेव्हा ते विमानतळाची सीमा ओलांडूही शकले नाही. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील या विमानात होते अशी माहिती समोर येत आहे. विमानतळ परिसराला लागून असलेल्या एअर कस्टम कार्गो ऑफिसजवळ विमान कोसळले. विमान कोसळताच संपूर्ण परिसरात धुराचे लोट दिसले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com