गीरमधील दोन सिंहांचा विषबाधेने मृत्यू

महेश शहा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

अहमदाबाद: गुजरातमधील सरिस्का येथील प्रसिद्ध गीर अभयारण्यात दोन सिंहांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये एका सिंहिणीचाही समावेश आहे. अमरेली जिल्ह्यातील या अभयारण्यात सिंहांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. विषबाधा झाल्याने या सिंहांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरवातीला मृत सिंहांवर स्थानिक ग्रामस्थांनी विषप्रयोग केल्याचा सर्वप्रथम संशय होता. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र आता या सिंहांनी खाल्लेल्या जनावरामुळे त्यांना विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

वनविभागाचा वरिष्ठ अधिकारी म्हणाला, ""या सिंहानी मृत म्हैस खाल्ली होती. त्या म्हशीवर विषप्रयोग केला असण्याची शक्‍यता आहे. सिहांना मारण्यासाठीचे हे कृत्य केले गेले असण्याची शक्‍यता आहे. या भागात मोठ्या प्रमाणात सिंह आहेत. त्यांच्यावरदेखील अशा प्रकारे विषप्रयोग होण्याची शक्‍यता गृहीत धरून आता त्यांना या परिसरातून दूर हुसकवले जात आहे.

मुख्य वनरक्षक ए. पी. सिंह म्हणाले, ""सिंहांना मारण्यासाठी ज्यांनी भक्ष्यावर विषप्रयोग केला आहे त्यांच्या शोधासाठी वनविभागाने या संपूर्ण परिसराची कसून तपासणी सुरू केली आहे.

Web Title: ahmedabad news death of two lions in Gir