भाजपकडून घोडेबाजार सुरू असल्याचा दावा

महेश शहा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

अहमदाबाद : भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या सांगण्यावरून गुजरातमध्ये भाजपने "घोडेबाजार' सुरू केला असून, पाटीदार नेत्यांना पक्षात ओढण्यासाठी एक कोटी रुपयांची लाच दिली जात आहे, असा आरोप पाटीदार अनामत आंदोलन समितीचे नेते नरेंद्र पटेल यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे राज्यात भाजपला फटका बसण्याची शक्‍यता आहे.

अहमदाबाद : भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या सांगण्यावरून गुजरातमध्ये भाजपने "घोडेबाजार' सुरू केला असून, पाटीदार नेत्यांना पक्षात ओढण्यासाठी एक कोटी रुपयांची लाच दिली जात आहे, असा आरोप पाटीदार अनामत आंदोलन समितीचे नेते नरेंद्र पटेल यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे राज्यात भाजपला फटका बसण्याची शक्‍यता आहे.

पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याचे दोन कट्टर समर्थक रेश्‍मा पटेल आणि वरुण पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या दोघांनाही भाजपने एक कोटी रुपयांची लाच दिल्याचा नरेंद्र पटेल यांचा आरोप आहे. "दबावतंत्र वापरून पाटीदार नेत्यांना फोडण्याचा भाजपचा डाव आहे. मलादेखील वरुण यांच्यामार्फत एक कोटी रुपयांची लालुच दाखवून दहा लाख रुपये रोख टोकन रक्कम म्हणून देण्यात आले,' असे नरेंद्र पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हे पैसे पत्रकारांनाही त्यांनी दाखविले आणि ते आरक्षणासाठीच्या संघर्षात बळी पडलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना वाटणार असल्याचे त्यांनी सांगितले. मला भाजप विकत घेऊ शकत नाही, आपण त्यांना अखेरपर्यंत विरोध करू, असेही ते म्हणाले.

कॉंग्रेसनेही पाटीदार नेत्यांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांनी हार्दिक पटेललाच उमेदवारी देऊ केली होती; मात्र "निवडणूक लढणे हे आपले उद्दिष्ट नसून पाटीदारांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे हीच आपली मागणी आहे,' असे त्याने सांगितले. त्याने रेशमा आणि वरुण या आपल्या सहकाऱ्यांवरही भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल टीका केली. हार्दिक पटेलने विविध गावांना भेटी देणे सुरू केले आहे. त्याने गोध्रा येथे मुस्लिम समुदायाचीही भेट घेतली.

भाजपचे दबावतंत्र
रेश्‍मा पटेल आणि वरुण पटेल यांनी भाजपप्रवेश केला असतानाच ओबीसी नेते अल्पेश ठाकूर यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे दोन्ही पक्ष जातीचे राजकारण करण्यावरच भर देत असल्याचे दिसून येत आहे. आदिवासींची मते मिळविण्यासाठी दोन्ही पक्ष त्यांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.

Web Title: ahmedabad news gujrat election and politics