
Air India Dreamliner: अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेतील विमानाबाबत आता धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. एअर इंडियाचं ड्रीमलायनर बोइंग ७८७-८ विमान १२ जून रोजी अहमदाबादमध्ये कोसळलं. या दुर्घटनेत २७४ जणांचा मृत्यू झाला. उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदातच विमान दुर्घटनाग्रस्त झालं होतं. १२ वर्षे जुन्या असलेल्या या विमानाची अलिकडेच दुरुस्ती करण्यात आली होती.