

Massive AI Data Center Investment in Andhra
Sakal
नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात देशातील गुंतवणूक वाढत असून, ब्रुकफिल्ड, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अमेरिकन डिजिटल रिअल्टी यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘डिजिटल कनेक्शन’ कंपनीकडून सन २०३० पर्यंत आंध्र प्रदेशात एक गीगावॉट क्षमतेचे ‘डेटा सेंटर’ उभारणार आहे. या ‘डेटा सेंटर’साठी अंदाजे ११ अब्ज अमेरिकी डॉलर (अंदाजे ९८ हजार कोटी रुपये) गुंतवणूक केली जाणार आहे.