

AI Impact on Jobs Turns Fatal IT Engineer and Wife Die in Bengaluru Case
Esakal
बंगळुरूत आयटी इंजिनिअर असलेल्या ३२ वर्षीय भानू चंदर रेड्डी याने गळफास घेत आयुष्य संपवलं. त्यानंतर धक्का बसलेल्या पत्नीने काही वेळातच १८ व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. कर्नाटकातील उत्तर बंगळुरूत कोथनूर इथं घडलेल्या या घटनेमुळं खळबळ उडाली आहे. भानू चंदर रेड्डी एका आयटी कंपनीत होता. मात्र एआयमुळे त्याची नोकरी गेली होती. तर त्याची पत्नी बिबी शाझिया सिराज हीसुद्धा एका आयटी कंपनीत काम करत होती.