esakal | जयललितांनंतर राज्य सांभाळणारे पलानिस्वामी सत्ताच्युत; द्रमुक विजयी

बोलून बातमी शोधा

तमिळनाडूत सत्तांतर, पलानिस्वामींना पराभवाचा धक्का; द्रमुक विजयी
तमिळनाडूत सत्तांतर, पलानिस्वामींना पराभवाचा धक्का; द्रमुक विजयी
sakal_logo
By
विनायक होगाडे

चेन्नई : सध्या चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आज सुरु आहे. दक्षिणेतील मोठं राज्य तमिळनाडूमधील राजकीय सत्ताकारण आजच्या दिवशी ठरणार आहे. या राज्यातील मुख्य लढाई ही अण्णा द्रमुक आणि द्रमुक या दोन पक्षांमध्ये आहे. 2016 साली जयललिता यांच्या निधनानंतर ओ पनीरसेल्वम यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातली गेली होती. मात्र, ते फक्त 73 दिवसच मुख्यमंत्री राहिले होते. तर 2017 साली इ. के. पलानिस्वामी यांना राज्याचे मुख्यमंत्री बनवलं गेलं. तेव्हापासून ते आतापर्यंत त्यांच्याच हात राज्याचा कारभार आहे. ते सेलममधील इडाप्पडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांना या ठिकाणाहून तब्बल चारवेळा विजय प्राप्त झाला आहे. ते पहिल्यांदा 1989 मध्ये आमदार बनले होते.

इ के पलानिस्वामी इडापड्डीमधून मैदानात

विद्यार्थी राजकारणातून आपल्या करिअरची सुरवात करणारे इ के पलानिस्वामी यांचा जन्म 2 मार्च, 1954 साली तमिळनाडूतील सलेम जिल्ह्यामध्ये झाला होता. 1974 मध्ये ते अण्णा द्रमुक पक्षांसोबत जोडले गेले. तर 2017 साली ते तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनण्यात यशस्वी झाले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, द्रमुकने 118 जागांची मॅजिक फिगर पार केली आहे. सध्या द्रमुक 119 जागांवर आघाडीवर आहे. द्रमुकचा सहकारी पक्ष काँग्रेस 12 जागांवर आघाडीवर आहे. दोन्ही पक्षांच्या आघाडीने सध्या राज्यात स्पष्ट बहुमताचा आकडा गाठला आहे. सध्या अण्णा द्रमुक 82 जागांवर पुढे आहे. त्यामुळे पलानिस्वामी आता आपली खुर्ची गमावण्याच्या मार्गावर आहेत. या ठिकाणी द्रमुक पक्ष आपली सत्ता स्थापन करत असल्याचं चित्र आहे.

हेही वाचा: Live: ममतांच्या विजयानंतर शरद पवारांचे ट्विट

2016 साली जयललिता यांचं तर 2018 साली करुणानिधी यांचं निधन झालं. हे दोन्हीही चेहरे या राज्यातील राजकारणातले बडे चेहरे होते. दोघेही एकमेकांचे कट्टर विरोधक होते. त्यामुळे, एम करुणानिधी आणि माजी मुख्यमंत्री जयललिथा यांच्या मृत्यूनंतर होणारी ही पहिलीच विधानसभेची निवडणूक आहे. सध्या करुणानिधी यांचे कनिष्ठ चिरंजीव एम के स्टालिन यांच्या नेतृत्वाखाली द्रमुक तर विद्यमान मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखील अण्णा द्रमुक हा पक्ष लढतो आहे.

हेही वाचा: Live : केरळ, आसाम आणि पुदुच्चेरीत कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर?

तमिळनाडूतील 2016 मधील काय होती स्थिती?

2016 सालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अण्णाद्रमुक पुन्हा सत्तेवर आला होता. याआधी 2011 सालच्या निवडणुकीत देखील याच पक्षाने बाजी मारली होती. 2016 साली अण्णा द्रमुक पक्षाला 123 जागा मिळाल्या होत्या. भाजपला एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. तर काँग्रेसला 8 जागांवर विजय मिळवता आला होता.