MK Stalin: अद्रमुक 'गुलाम' तर भाजपच खरा 'देशद्रोही'; CM स्टॅलिन असं का म्हणाले?

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी आपले राजकीय विरोधात भाजप आणि अद्रमुकवर जोरदार टीका केली आहे.
Stalin
Stalin

चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी आपले राजकीय विरोधात भाजप आणि अद्रमुकवर जोरदार टीका केली आहे. रामनाथपुरम इथं एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी या दोन्ही पक्षांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यामध्ये भाजपला त्यांनी खरा देशद्रोही पक्ष असंही संबोधलं. (AIADMK is a slave of BJP BJP is real anti Indians slams Tamil Nadu CM MK Stalin)

अद्रमुक हा पक्ष भाजपचा गुलाम आहे. डीएमके हा प्रादेशिक पक्ष आहे आणि आम्ही सर्व राज्यांतील समस्यांवर आवाज उठवत आहोत. पण तरीही भाजप आम्हाला देशविरोधी म्हणतं. पण आता भाजपच खरा देशद्रोही पक्ष बनला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी दोन्ही पक्षांवर सडकून टीका केली. (Latest Marathi News)

Stalin
Vidhan Sabha Elections: छत्तीसगड, मध्य प्रदेशच्या निवडणुकांची लवकरच घोषणा?; भाजपनंतर काँग्रेसकडून महत्वाच्या नियुक्त्या

दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांची इंडिया आघाडी तयार झाली आहे. या आघाडीत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचाही समावेश आहे. या इंडिया आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार टीका करत आहेत. त्यांनी या 'इंडिया'ची तुलना इंडियन मुजाहिद्दीन, ईस्ट इंडिया कंपनी यांच्याशी केली होती. तसेच या आघाडीला देशद्रोही म्हटलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com