तमिळनाडूत राजकीय खळबळ; पनीरसेल्वम यांची पदावरून हकालपट्टी

वृत्तसंस्था
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

चेन्नई - एआयडीएमकेच्या सचिव व्ही. के. शशिकला यांनी पक्षाचे खजिनदार ओ. पनीरसेल्वम यांना पदावरून हटविण्याचा निर्णय घेत त्यांच्या जागी डिंडिगुल श्रीनिवासन यांची नियुक्ती केली आहे. पनीरसेल्वम यांचे विरोधकांशी संबंध असल्याचा आरोप एआयडीएमकेने केला आहे. दरम्यान, या निर्णयामुळे तमिळनाडूत राजकीय खळबळ उडाली आहे.

चेन्नई - एआयडीएमकेच्या सचिव व्ही. के. शशिकला यांनी पक्षाचे खजिनदार ओ. पनीरसेल्वम यांना पदावरून हटविण्याचा निर्णय घेत त्यांच्या जागी डिंडिगुल श्रीनिवासन यांची नियुक्ती केली आहे. पनीरसेल्वम यांचे विरोधकांशी संबंध असल्याचा आरोप एआयडीएमकेने केला आहे. दरम्यान, या निर्णयामुळे तमिळनाडूत राजकीय खळबळ उडाली आहे.

शशिकला यांनी तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निवासस्थानी मंगळवारी रात्री एक वाजता सर्व आमदारांबी बैठक बोलाविली. या बैठकीत पनीरसेल्वम यांना पदावरून हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर शशिकला यांनी त्यांच्या समर्थकांची भेट घेऊन "पनीरसेल्वम यांना आम्ही पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वही रद्द करणार आहोत. पनीवरसेल्वम यांच्यामागे डीएमके आहे. आम्ही सर्व आमदार एका कुटुंबाप्रमाणे सोबत आहोत. आम्हाला काहीही अडचण नाही' असेही सांगितले. विधानसभेचे सत्र सुरू असताना सभागृहामध्ये विरोधी पक्षनेते एम. के. स्टॅलिन आणि पनीरसेल्वम परस्परांकडे पाहून सतत हसत असतात, असा आरोपही त्यांनी केला. त्यावर पनीरसेल्वम यांनी 'माणूस हसू शकतो आणि  हा माणूस आणि प्राण्यांमधील फरक आहे' अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. "मी जयललिता यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी सतत रुग्णालयात जात होतो. मात्र मला एकदाही त्यांना भेटू दिले नाही', असा खुलासाही पनीरसेल्वम यांनी केला.

पनीरसेल्वम यांच्यावर टीका करत एआयडीएमकेचे नेते थंबीदुरई यांनी या सर्व प्रकारामागे डीएमके असल्याचा दावा केला आहे. "आम्ही सर्व 134 आमदार सोबत आहोत. आशा आहे की सरकार चेन्नईमध्ये येईल आणि शशिकला यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित करेल.' अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. ओ. पनीरसेल्वम दिल्लीमध्ये गेले होते. त्यांनी राष्ट्रपती आणि गृहमंत्रालयाची भेट घेतली. त्यांनी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना अपयश आले नाही, असेही त्यांनी पुढे सांगितले.

Web Title: AIADMK removes Panneerselvam as party treasurer