अण्णा द्रमुकचे नेतृत्व शशिकला यांच्याकडे

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

जयललितांचा वाढदिवस राष्ट्रीय कृषी दिन
पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये एकूण 14 ठराव मंजूर करण्यात आले. त्यामध्ये जयललिता यांचा जन्मदिवस राष्ट्रीय कृषी दिन म्हणून साजरा करण्यात यावा असाही ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. तसेच, जयललिता यांना मॅगसेसे पुरस्कार आणि जागतिक शांततेसाठी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे असेही ठराव मंजूर करण्यात आले. 

चेन्नई- तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला यांच्याकडे ऑल इंडिया अण्णा द्रमुकचे (AIADMK) सर्वेसर्वा म्हणून नेतृत्व सोपविण्याचा ठराव पक्षाने आज (गुरुवारी) मंजूर केला. 

शशिकला यांची पक्षाचे महासचिव (जनरल सेक्रेटरी) म्हणून निवड करण्यात येईल किंवा हे पद रिक्त ठेवून त्यांच्यासाठी वेगळे पद निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. जयललिता यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर निवड करण्यासाठी पक्षाच्या वतीने चेन्नई येथे गुरुवारी सकाळी सर्वसाधारण बैठक बोलावण्यात आली होती. त्यामध्ये याबाबतचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानुसार व्ही.के. शशिकला यांच्याकडे पक्षाची सर्व सूत्रे सोपविण्यात आली. 

जयललिता यांनी पक्षाच्या महासचिवपदाची जबाबदारी तीस वर्षे सांभाळली. AIADMK पक्षामध्ये शशिकला यांच्या नेतृत्वाला कोणाचेही अंतर्गत आव्हान नाही. पक्षाचे जिल्हा सचिव आणि विविध विभागांच्या अध्यक्षांनी यापूर्वीच शशिकला यांच्या नेतृत्वाला मान्यता दिली आहे. 
 

Web Title: AIADMK resolves to works under Sasikala’s leadership