esakal | एम्समध्ये होणार नेजल व्हॅक्सिनची क्लिनिकल ट्रायल
sakal

बोलून बातमी शोधा

एम्समध्ये होणार नेजल व्हॅक्सिनची क्लिनिकल ट्रायल

भारत बायोटेकच्या नेजल व्हॅक्सिनची क्लिनिकल ट्रायल दिल्लीच्या एम्स रुग्णालयात होणार आहे.

एम्समध्ये होणार नेजल व्हॅक्सिनची क्लिनिकल ट्रायल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - भारत बायोटेकच्या नेजल व्हॅक्सिनची क्लिनिकल ट्रायल दिल्लीच्या एम्स रुग्णालयात होणार आहे. या क्लिनिकल ट्रायलसाठी एम्सकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पुढच्या एक ते दोन आठवड्यात या नेजल व्हॅक्सिनची ट्रायल सुरु होण्याची शक्यता आहे. याआधी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनची ट्रायलसुद्धा एम्समध्ये झाली होती.

कोव्हॅक्सिननंतर भारत बायोटेकच्याच नेजल व्हॅक्सिनची क्लिनिकल ट्रायल आता एम्समध्ये होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. क्लिनिकल ट्रायल करण्याआधी एम्स रुग्णालयाच्या एका कमिटीची मंजुरी घ्यावी लागते. या प्रक्रियेनंतर ट्रायल सुरु केली जाईल. एम्सचे कम्युनिटी मेडिसिन डॉक्टर संजय राय यांनी म्हटलं की, एथिकल मंजुरी मिळाल्यानंतर ट्रायल सुरु होईल. सर्व सोपस्कर पार पडल्यानंतर ट्रायलची पुढची प्रक्रिया होईल.

हेही वाचा: कोरोनानं झालेल्या मृत्यूंसाठी SCनं नाकारली नुकसान भरपाई; म्हटलं...

कोरोनावर नेजल व्हॅक्सिन जास्त प्रभावी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एम्समधील डॉक्टर संजय राय यांच्या मते यामध्ये कोणतेही इंजेक्शन नसेल, तर नाकाद्वारे ही लस देण्यात य़ेणार आहे. त्यामुळे ससंर्ग रोखण्यामध्ये ही लस यशस्वी ठरण्याची शक्यता आहे. सध्या ज्या लशी दिल्या जात आहेत त्यामुळे कोरोनाचा धोका कमी होतो तसंच मृत्यूचे प्रमाण कमी झाले. ही लस ससंर्ग रोखण्यात यशस्वी होईल अशी आशा रॉय यांनी व्यक्त केली.

नेजल व्हॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी एम्समध्ये होईळ. या लशीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणी ही ३०० लोकांवर करण्यात येणार आहे. पहिल्या डोसनंतर दुसरा डोस चार आठवड्यांनी दिला जाईल. यानंतर तिसऱ्या टप्प्यात डबल ब्लाइंड ट्रायल करण्यात येईल. यात काही जणांना नेजल व्हॅक्सिन तर काहींना प्लेसिबो देण्यात येईल.

loading image
go to top