ब्रिटनमधील कोरोनाचा नवा स्ट्रेन डिसेंबरपूर्वीच भारतात, AIIMS च्या प्रमुखांनी व्यक्त केली शक्यता

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 December 2020

हा नवा स्ट्रेन अधिक संसर्गजन्य असल्याने चिंताजनक आहे.

नवी दिल्ली : कोरोनाचा नवा स्ट्रेन गेल्या आठवड्यात ब्रिटनमध्ये सापडला आणि सगळीकडे पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण पसरले. हा नवा स्ट्रेन अत्यंत संसर्गजन्य असून आधीच्या कोरोना व्हायरसपेक्षा अधिक गतीने पसरण्याची क्षमता या स्ट्रेनमध्ये आहे. सध्या भारतात या स्ट्रेनची बाधा झालेले किमान 20 रुग्ण सापडल्याची माहिती आहे. याबाबत बोलताना All India Institute of Medical Sciences (AIIMS) चे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी काल बुधवारी सांगितलं की, कोरोनाचा हा नवा स्ट्रेन भारतात डिसेंबर महिन्याआधीच आला असण्याची शक्यता आहे. 

ब्रिटनमध्ये हा नवा स्ट्रेन सप्टेंबरमध्ये आढळला आहे, त्यामुळे कदाचित नोव्हेंबर महिन्यातच तो भारतात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाचा हा नवा स्ट्रेन नेहमीच्या कोरोना विषाणूपेक्षा 70 टक्के अधिक संसर्गजन्य आहे. अधिकृतरित्या हा नवा स्ट्रेन डिसेंबरमध्ये सापडला असला तरीही तो त्याआधीच भारतात आला असावा का याविषयी एएनआयशी बोलताना रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं की, अशी शक्यता नाकारता येत नाही कारण ब्रिटनमध्ये या नव्या स्ट्रेनमुळे बाधित रुग्ण सप्टेंबर महिन्यात आढळले होते. 

हेही वाचा - नववर्षाच्या उत्साहाला आवर घाला

त्यांनी म्हटलंय की, नव्या स्ट्रेनमुळे बाधित रुग्ण फारसे नसले तरीही या नव्या विषाणूबाबतची चर्चा सुरु असताना ब्रिटनसोबत प्रवास सुरु होता. हॉलंडमधील डाटा पहा, त्यांनी म्हटलंय की ब्रिटनमध्ये डिसेंबरमध्ये नोंद व्हायच्या आधीच लोकांना या नव्या स्ट्रेनची बाधा झाली होती. त्यामुळे अशी शक्यता आहे की, हा नवा स्ट्रेन डिसेंबरआधीच नोव्हेंबर महिन्यात भारतात आला असावा. त्यांनी पुढे म्हटलंय की, हा नवा स्ट्रेन अधिक संसर्गजन्य असल्याने चिंताजनक आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AIIMS Director Randeep Guleria says New Covid-19 strain could have entered India prior to December