भाजप नेत्याची विश्रामगृहाच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 25 February 2020

हैद्राबादच्या पोलिसांनी मंगळवारी (ता.२५) सकाळी त्यांना चौकशीसाठी विश्रामगृहावर नेल्याचे कळते. पोलिसांसह ते शिवनेरी या शासकीय विश्रामगृहाच्या चौथ्या मजल्यावरील कक्षात होते. चोरी झालेले सोने महाराष्ट्रातील व्यापाऱ्याने खरेदी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या प्रकरणाच्या तपासासाठी ते नाशिकला आले होते. यावेळी त्यांना विश्रामगृहात घेऊन जाण्यात आले होते. मात्र चौकशी दरम्यानच...

नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या व्यापरी आघाडीचे सरचिटणीस अजय बिरारी यांनी आज दुपारी येथील शासकीय विश्रामगृहाच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. संशयास्पद सोन्याच्या व्यवहारासंदर्भात त्यांना हैद्राबादच्या पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या चौकशी दरम्यान त्यांनी विश्रामगृहातून उडी घेतली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. 

अशी घडली घटना...

आज (ता.२५)  दुपारी दोनला ही घटना घडली. हैद्राबादच्या पोलिसांनी मंगळवारी सकाळी त्यांना चौकशीसाठी विश्रामगृहावर नेल्याचे कळते. पोलिसांसह ते शिवनेरी या शासकीय विश्रामगृहाच्या चौथ्या मजल्यावरील कक्षात होते. चोरी झालेले सोने महाराष्ट्रातील व्यापाऱ्याने खरेदी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या प्रकरणाच्या तपासासाठी ते नाशिकला आले होते. यावेळी त्यांनी अजय बिरारी यांना विश्रामगृहात घेऊन जाण्यात आले होते. ही चौकशी सुरु असतांनाच बिरारी यांनी चौथ्या मजल्यावरील कक्षातून उडी घेतली घेतल्याचे समजते. त्यावेळी डांबरी रस्त्यावर ते पडले. त्यावेळी त्यांना तातडीने जवळच असलेल्या शासकीय रुग्णालयात दाखळ केले. त्यांची तपासणी केली असता ते मृत झाल्याचे रुग्णालयाच्या प्रशासनाने सांगीतले. 

हेही वाचा > हृदयद्रावक! रक्ताच्या थारोळ्यात असूनही "माऊलीची" बाळाची घट्ट मिठी सुटली नव्हती...अखेर..

पक्षाच्या विविध नेत्यांची रुग्णालयात गर्दी 

बिरारी भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी आघाडीचे प्रदेश सरचिटणीस असल्याचे कळते. भाजपचे सक्रीय व वरिष्ठ स्तरावर सगळ्यांशी चांगला संपर्क असलेले नेते आहेत. त्यामुळे ही घटना समजल्यावर पक्षाच्या विविध नेत्यांनी रुग्णालयात गर्दी केली होती. 

हेही वाचा > धक्कादायक! खेळणाऱ्या चिमुकलीचा आवाज अचानक शांत झाला..आईने पाहिले तेव्हा तिचे पाय टबमध्ये होते...

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader commits suicide by jumping from the fourth floor of the government rest house at Nashik marathi news