esakal | ओवैसींचं योगी आदित्यनाथांना चॅलेंज; 'तुम्ही योगी आहात हे २४ तासात सिद्ध करून दाखवा!'
sakal

बोलून बातमी शोधा

AIMIM_Asaduddin_Owaisi

जमुई विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार श्रेयसी सिंह यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ गेले होते. त्यावेळी निवडणूक रॅलीला संबोधित करताना त्यांनी राहुल गांधी आणि ओवैसी यांच्यावर टीका केली होती.

ओवैसींचं योगी आदित्यनाथांना चॅलेंज; 'तुम्ही योगी आहात हे २४ तासात सिद्ध करून दाखवा!'

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्व राजकीय पक्ष व्यस्त आहेत. नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. जमुई विधानसभा मतदार संघातील एका प्रचारसभेदरम्यान बुधवारी (ता.२१) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली होती. योगी आदित्यनाथ म्हणाले होते की, 'ओवैसी आणि गांधी हे पाकिस्तानचे कौतुक करत असतात.' 

'टीईटी'च्या हजारो उमेदवारांना दिलासा मिळणार? नियमात बदल होण्याची चिन्हे

याचा खरपूस समाचार घेत ओवैसी यांनी योगींवर पलटवार केला आहे. ओवैसी म्हणाले की, 'योगी फ्रस्टेशनमधून असे बोलत आहेत. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी २४ तासात आपण खरे योगी असल्याचे सिद्ध करून दाखवावे. जेव्हा मी पाकिस्तानात गेलो होतो, तेव्हा मी भारतीय लोकशाहीबद्दल बोललो होतो, हे त्यांना माहित नाही काय?'

सुप्रीम कोर्टचा मोठा निर्णय! आता सुनावणीची ढकलगाडी थांबणार​

दरम्यान, जमुई विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार श्रेयसी सिंह यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ गेले होते. त्यावेळी निवडणूक रॅलीला संबोधित करताना त्यांनी राहुल गांधी आणि ओवैसी यांच्यावर टीका केली होती. ''हे दोघेही पाकिस्तानचे कौतुक करत आहेत. या दोघांकडून तुम्ही देशाच्या हिताची कल्पना कशी करू शकता? ते देशाचे हित करतील का? जे आपल्या देशात दहशतवाद पसरवत आहेत, त्यांच्या हिताबद्दल बोलत आहेत. अशा देशाच्या शत्रूकडून काय अपेक्षा करता येईल? काश्मीरमध्ये कलम ३७० हटविल्यानंतर राहुल आणि ओवेसी यांना त्रास सहन करावा लागला,' असेही योगींनी म्हटले होते. 

- महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top