फक्त यादवच मुख्यमंत्री होतात, 20 टक्के मुसलमान का चालत नाही?

Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisiesakal
Summary

'आम्ही सर्वांची लैला झालो आहोत. आमचं नाव घेतल्याशिवाय त्यांच्या घरात दिवाच पेटत नाही.'

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Uttar Pradesh Assembly Election) 100 जागा लढवण्याची घोषणा करणाऱ्या AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी समाजवादी पक्षावर (Samajwadi Party) निशाणा साधलाय. 'अजेंडा आज तक' या कार्यक्रमात बोलताना ओवैसी म्हणाले, यूपीमध्ये 19 टक्क्यांहून अधिक मुस्लिम आहेत. मात्र, आजपर्यंत त्यांचा कोणीही मुख्यमंत्री झाला नाही. काँग्रेस, सपा आणि बसपा या पक्षांनी नेहमीच यूपीमध्ये मुस्लिमांची मते घेतली. मात्र, मुस्लिमांच्या नेतृत्वाचा कोणताच विकास झाला नाही. आमचा फक्त 'लैला' म्हणून वापर केला गेला, असंही ते म्हणाले.

सपा सरकारमध्ये यादवांना महत्त्व आणि मुस्लिमांना हिन वागणूक दिली जातेय, असा गंभीर आरोप औवेसी यांनी केलाय. ते पुढे म्हणाले, 10 टक्के यादव दोन-दोनदा मुख्यमंत्री झाले. पण, 19% पेक्षा जास्त मुस्लिम आहेत, त्यांचं काय झालं? मुस्लिम ही बँड बाजा पार्टी आहे का? कुणीही यावं आणि वाजवून जावं, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला. मी मुस्लिमांना त्यांचं नेतृत्व तयार करण्यास सांगत आहे. आज यूपीमध्ये पाहिलं तर मुस्लिम मतांची काहीच ताकद नाही. प्रत्येक समाजानं आपलं नेतृत्व ज्या पद्धतीनं बनवलंय, त्याच पद्धतीनं आपणही तयारी केली पाहिजे. आता अखिलेश (Akhilesh Yadav) म्हणत आहेत, की जाटांना उपमुख्यमंत्री बनवू, पण 19% मुस्लिम असलेले यांना का चालत नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Asaduddin Owaisi
मला अध्यक्षपदावर पुन्हा संधी द्या; भाजप आमदाराची अजित पवारांकडे मागणी

ओवैसी म्हणाले, जाट, कुर्मी आणि यादवांसह सर्व लोकांकडं नेतृत्व आहे. परंतु, मुस्लिमांकडं का नेतृत्व नाही, हा मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाचंच उत्तर देण्यासाठी आम्ही काम करत आहोत. आम्ही सर्वांची लैला झालो आहोत. आमचं नाव घेतल्याशिवाय त्यांच्या घरात दिवाच पेटत नाही. एवढंच नाही, तर काँग्रेसच्या नेतृत्वावरही ओवैसींनी हल्लाबोल केलाय. राहुल गांधी यांच्या नेतृत्व क्षमतेबद्दल विचारले असता ओवैसी म्हणाले, ते कोण आहेत, आम्ही त्यांना ओळखतही नाही, असं त्यांनी नमूद केलं.

Asaduddin Owaisi
सियालकोट : श्रीलंकेच्या कामगारावर जमावाचा हल्ला; भरचौकात जाळला मृतदेह

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com