अकबरुद्दीन ओवेसी यांची प्रकृती गंभीर 

वृत्तसंस्था
बुधवार, 12 जून 2019

अकबरुद्दीन हे आंध्र प्रदेशातील चंद्रायानगुट्टा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मल्खानगिरीचे खासदार आणि तेलंगण प्रदेश कार्यकारी समितीचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांनीही अकबरुद्दीन या आजारातून लवकर बरे व्हावे म्हणून प्रार्थना केली होती.

हैदराबाद : "एमआयएम'चे सर्वेसर्वा खा. असदुद्दीन ओवेसी यांचे कनिष्ठ बंधू आणि आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांची प्रकृती गंभीर असून, सध्या त्यांच्यावर लंडनमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तत्पूर्वी ईद-ए-मिलाफ कार्यक्रमादरम्यान बोलतानाच असदुद्दीन यांनीच अकबरुद्दीन यांच्या प्रकृती अस्वास्थ्याबाबत माहिती दिली होती. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी आज ट्‌विटरवरून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली.

अकबरुद्दीन हे 2011 मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या राजकीय हिंसाचारामध्ये गंभीर जखमी झाले होते. त्या वेळी झालेल्या झटापटीमध्ये त्यांना गोळी लागली होती, तसेच त्यांच्यावर चाकू हल्लाही करण्यात आला होता. बंदुकीच्या गोळीचे काही तुकडे अद्याप अकबरुद्दीन यांच्या शरीरामध्ये आहेत, तीन दिवसांपूर्वी त्यांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने लंडन येथील रुग्णालयामध्ये हलविण्यात आले होते.

अकबरुद्दीन हे आंध्र प्रदेशातील चंद्रायानगुट्टा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मल्खानगिरीचे खासदार आणि तेलंगण प्रदेश कार्यकारी समितीचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांनीही अकबरुद्दीन या आजारातून लवकर बरे व्हावे म्हणून प्रार्थना केली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AIMIM MLA Akbaruddin Owaisi health deteriorated