एआयएमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी विजयी

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

हैदराबादः एआयएमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी विजयी चंद्रायनगुट्टा मतदारसंघामधून विजयी झाले आहेत.

तेलंगणमध्ये आज (मंगळवार) सकाळी मतमोजणीला सुरवात झाल्यानंतर तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत होती. पण, काही वेळातच टीआरएसने मोठी आघाडी घेतली.  सकाळी अकरापर्यंत मिळालेल्या कौलानुसार टीआरएस 72 आणि काँग्रेस 34, भाजप 3 तर इतर 10 जण आघाडीवर जागांवर आहेत.

प्रचारादरम्यान अकबरुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका केली होती. आदित्यनाथ यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, 'आमच्या 100 पिढ्या भारतात राहतील. आम्ही तुमच्याशी लढू आणि तुम्हाला पराभूत करु. आम्हाला पाकिस्तानला पाठवण्याची योगींची क्षमता नाही.' ओवेसी बंधूंनी पंतप्रधानांवर केलेल्या टीकेमुळे ते चर्चेत आले होते.

दरम्यान, 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीवेळी ओवेसी यांनी डॉ. खयाम खान यांना 59,274 मतांनी पराभूत केले होते. त्यावली टीआरएसला 63, काँग्रेस 21, टीडीपी 15, एआयएमआयएम 7, भाजप 5 व इतर 5 जण विजयी झाले होते.

Web Title: AIMIMs Akbaruddin Owaisi wins from Chandrayangutta in Telangana