esakal | उत्पन्नात 90 टक्क्यांनी घट झाल्याची 'मन की बात' ऐकली का?
sakal

बोलून बातमी शोधा

उत्पन्नात 90 टक्क्यांनी घट झाल्याची 'मन की बात' ऐकली का?

'मन की बात' या कार्यक्रमातून 2014 पासून आतापर्यंत 30.8 कोटींचे उत्पन्न मिळालं असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी राज्यसभेत सांगितलं.

उत्पन्नात 90 टक्क्यांनी घट झाल्याची 'मन की बात' ऐकली का?

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या रेडिओ कार्याक्रमातून मिळणाऱ्या उत्पन्नात 90 टक्क्यांची घट झाली आहे. 'मन की बात' या कार्यक्रमातून 2014 पासून आतापर्यंत 30.8 कोटींचे उत्पन्न मिळालं असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी राज्यसभेत सांगितलं. उपलब्ध डेटानुसार, कार्यक्रमाच्या माध्यमातून ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनला 2017-18 मध्ये 10.64 कोटी रुपये जाहिरातीच्या माध्यमातून मिळाल होते. पण, 2020-21 मध्ये यात घट होऊन ते 1.02 कोटी झाले आहे. 2018-19 मध्ये 7.47 कोटी आणि 2019-20 मध्ये 2.56 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. 'द प्रिंट'ने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (AIR Doordarshan Revenue generated Prime Minister Narendra Modi monthly radio Mann Ki Baat dipped last three years)

उत्पन्न घटन्यामागचे नेमकं कारण आयबी मंत्र्यांकडून सांगण्यात आलं नाही, पण कार्यक्रमाचा उद्देश लोकांशी संवाद साधण्याचा असल्याचं राज्यसभेत सांगण्यात आलं. पंतप्रधान कार्यालयाकडून चालवला जाणारा हा कार्यक्रम, ऑल इंडिया रेडिओ नेटवर्कसह 34 दूरदर्शन चॅनल आणि 91 खासगी सॅटेलाईट टेलिव्हिजन चॅनलवर चालवले जाते. मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मोदींनी या माध्यमाची मदत घेतली आहे.

हेही वाचा: वाद शिगेला! सिद्धूच्या जाहीर माफीसाठी अमरिंदर सिंग बसले अडून

सरकारी आकडेवारीनुसार, कार्यक्रमाने आतापर्यंत 11.8 कोटी व्हिवरशीप मिळवली आहे आणि 2020 मध्ये 14.7 कोटी लोकांपर्यंत पोहोचण्यात आलं. प्रसार भारतीकडून या कार्यक्रमाला 51 भाषांमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम केलं जातं. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी चालवण्यात येतो. या कार्यक्रमाचा उद्देश उत्पन्न कमावण्याचा नाही. देशातील महत्त्वाच्या घटना आणि सरकारी योजना लोकांना सांगण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

हेही वाचा: भारतात कोरोनामुळे 'इतक्या' मुलांनी आई-वडिलांना गमावलं!

'मन की बात'मधून उत्पन्न कसे कमवले जाते?

ऑल इंडिया रेडिओ आणि डीडीवर मन की बात कार्यक्रमादरम्यान जाहिरात दाखवून उत्पन्न कमवले जाते. प्रिंटच्या रिपोर्टनुसार, उत्पन्न घटण्यामागे अनेक कारणे आहेत. पहिलं कारण कोरोना महामारीचं आहे. जाहिरात इंडस्ट्रिला महामारीचा फटका बसला आहे. त्याची झळ DD आणि AIR लाही बसली आहे. 'मन की बात'ला सरकार आणि खासगी कंपन्यांकडून जाहिराती मिळतात. पण, या दोन्हींमध्ये घट झालीये. AIR आणि DD कडून ग्राहकांना मिळणारी निकृष्ट सेवा हेही उत्पन्न घटीमागचं कारण आहे. सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या तीन वर्षात प्रसार भारतीचे उत्पन्न अर्ध्याने घटले आहे. अनेक छोटे स्टेशन बंद करण्यात आल्याचा फटका बसल्याचं सांगण्यात येतंय.

loading image