esakal | वाद शिगेला! सिद्धूच्या जाहीर माफीसाठी अमरिंदर सिंग बसले अडून
sakal

बोलून बातमी शोधा

Amarinder Singh and Sidhu

वाद शिगेला! सिद्धूच्या जाहीर माफीसाठी अमरिंदर सिंग बसले अडून

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: पंजाबमधील अंतर्गत मतभेदांवर काँग्रेसने (Punjab congress) तोडगा शोधून काढला असला, तरी हा वाद लवकर संपुष्टात येण्याची शक्यता दिसत नाहीय. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह (Amarinder Singh) आणि नवज्योत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) मधील वाद शमण्याऐवजी आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धूने जाहीर माफी मागावी, अशी मागणी अमरिंदर सिंग यांनी केली आहे. या दोन्ही नेत्यांना एकत्र आणण्यासाठी काँग्रेस हायकमांडचा (congress high command) शांततेचा फॉर्म्युला फेल होताना दिसतोय. (With Amarinder Singhs fresh demand for apology tiff with Sidhu to intensify dmp82)

सिद्धूची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी शुभेच्छा दिलेल्या नाहीत. उलट सिद्धूने माफी मागावी, अशी मागणी करुन हा वाद इतक्यात शमणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. नवज्योत सिंग सिद्धूने अमरिंदर सिंग यांच्या भेटीची वेळ मागितल्याचे वृत्त मुख्यमंत्र्यांचे प्रसारमाध्यम सल्लागार रवीन ठुकराल यांनी फेटाळून लावले.

हेही वाचा: सहा महिन्यात किती टक्के मुंबईकर झाले 'बाहुबली'? वाचा सविस्तर

सिद्धूने कॅप्टन अमरिंदर यांच्या भेटीची वेळ मागितल्याचे वृत्त पूर्णपणे चुकीचे आहे. "अमरिंदर यांच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. सोशल मीडियावरुन सिद्धूने मुख्यमंत्र्यांवर व्यक्तीगत टीका केली होती. त्याबद्दल सिद्धू जाहीरपणे माफी मागत नाहीत, तो पर्यंत ही भेट होणार नाही" असे अमरिंदर यांच्या प्रसारमाध्यम सल्लागाराने स्पष्ट केले.

हेही वाचा: Hotshots बंद झाल्यानंतरही राज कुंद्राकडे होता 'प्लान बी'

मागच्या दोन महिन्यात सिद्धूने १५० टि्वट केले. त्यात त्याने मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. कॅप्टन आणि बादल यांच्यात संगनमत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे अमरिंदर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

loading image