esakal | भारतात कोरोनामुळे 'इतक्या' मुलांनी आई-वडिलांना गमावलं!
sakal

बोलून बातमी शोधा

Child Orphan

कोरोना महामारीच्या थैमानामुळे भारतात अनेक लोकांचा जीव गेला आहे. याचा सर्वााधिक प्रभाव लहान मुलांवर पडला. अनेकांनी आपल्या आई-वडिलांना गमावलं आहे.

भारतात कोरोनामुळे 'इतक्या' मुलांनी आई-वडिलांना गमावलं!

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- कोरोना महामारीच्या थैमानामुळे भारतात अनेक लोकांचा जीव गेला आहे. याचा सर्वााधिक प्रभाव लहान मुलांवर पडला. अनेकांनी आपल्या आई-वडिलांना गमावलं आहे. कोरोना विषाणूमुळे भारतसह 21 देशांमध्ये आतापर्यंत जवळपास 15 लाख लहान मुलांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे. प्रतिष्ठित द लॅन्सेटमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, 21 देशांमध्ये 15 लाखांपेक्षा अधिक लहान मुलांनी आई-वडिलांचा आधार गमावलाय. भारतात 1 लाख 19 हजार मुलांच्या आई-वडिलाचा कोरोना विषाणूने बळी घेतलाय. (1 lakh 19 thousand children lost their parents in Corona period in india)

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ड्रग एब्यूज (एनआयडीए) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने एका अभ्यासात म्हटलंय की, भारतात कोरोना महामारीमुळे 25,500 लहान मुलांनी आपल्या आईला गमावलं आहे, तर 90,751 मुलांनी आपल्या वडिलांना गमावलं आहे. 12 जणांनी आई-वडील दोघांना गमावलं. अभ्यासात असा अंदाज लावण्यात आलाय की, जगात 1,134,000 मुलांनी आपले पालक आई-वडील किंवा आजा-आजोबा यांना गमावलं आहे. यात 10,42,000 मुलं असे आहेत ज्यांनी आपले आई-वडील किंवा दोघांना गमावलंय.

हेही वाचा: सीरो सर्व्हे जाहीर झाल्यानंतर केंद्राची 7 पॉईंट अ‍ॅडव्हायजरी

एकूण 1,562,000 मुलांनी कमीतकमी आई-वडील किंवा आजी-आजोबा (किंवा इतर पालक) गमावण्याचा अनुभव घेतला. काळजी घेणारे आई-वडील किंवा आजी-आजोबांना गमावणाऱ्या मुलांची सर्वाधिक संख्या दक्षिण आफ्रिका, पेरु, अमेरिका, भारत, ब्राझील आणि मॅक्सिको या देशांमध्ये आहे.

हेही वाचा: सुखी संसाराला जुन्या प्रेमाचे ग्रहण! माहेर-सासरचे दरवाजे बंद

रिपोर्टच्या दाव्यानुसार, 2,898 भारतीय मुलांनी आपले कस्टोडियल आजी-आजोबा यांच्यापैकी एकाला गमावलं आहे. तर, यातील 9 जणांनी दोघांना गमावलं आहे. भारतात दर 1 हजार मुलांमागे आई-वडील किंवा पालक नातेवाईकांच्या मृत्यूचे प्रमाण 0.5 टक्के आहे. हेच प्रमाण दक्षिण आफ्रिकेमध्ये(6.4) , पेरु(14.1), ब्राझील (3.5), कोलंबिया(3.4), मॅक्सिको(5.1), रशिया(2.0) आणि यूएस 1.8) इतके आहे. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत भारतातील प्रमाण कमी आहे.

loading image