Agneepath Scheme : वायुसेनेकडूनही अग्निवीरांसाठी अधिसूचना जारी

Air Force also issues notification for agniveer
Air Force also issues notification for agniveerAir Force also issues notification for agniveer

नवी दिल्ली : वायुसेनेने (Air Force) अग्निपथ योजनेबाबत अधिसूचना जारी केली आहे. यासाठी २४ जून ते ५ जुलै या कालावधीत नोंदणी केली जाणार आहे. २४ जुलैपासून ऑनलाइन परीक्षा सुरू होणार आहे. याआधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अग्निपथ योजना अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगून ही योजना आता परत केली जाणार नसल्याचे सांगितले होते. चांगल्या उद्यासाठी बदल आवश्यक आहे, असेही अजित डोवाल म्हणाले होते. (Air Force also issues notification for agniveer)

एकटा अग्निवीर कधीच संपूर्ण सैन्य नसतो. अग्निवीर फक्त पहिल्या चार वर्षांत भरती झालेले सैनिक असतील. उर्वरित सैन्याचा मोठा भाग अनुभवी लोकांचा असेल. जे नियमित अग्निवीर असतील. त्यांना चार वर्षांनंतर जवळून प्रशिक्षण दिले जाईल, असेही अग्निपथ भरती योजनेवर अजित डोवाल म्हणाले.

Air Force also issues notification for agniveer
भाजप व्यंकय्या नायडूंना राष्ट्रपतीपदाचा उमेदवार बनवणार?

नुकतेच केंद्र सरकारने सैन्यात भरतीसाठी अग्निपथ योजना जाहीर केली आहे. या योजनेला देशभरातील तरुणांकडून विरोध होत आहे. अलीकडेच बिहारमध्ये (Bihar) तरुणांनी रस्त्यावर उतरून तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडवून आणल्या. देशभरात या योजनेला विरोध होत असताना अनेक संघटनांनी २० जून रोजी भारत बंदची घोषणा केली होती.

वायुसेनेपूर्वी (Air Force) भारतीय लष्कराने अग्निपथ योजनेसंदर्भात नवीन नियमांनुसार भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. अग्निपथ योजनेला विरोध होत असताना भारतीय लष्कराने (Indian Army) सोमवारी आवश्यक अधिसूचना जारी (Notification issued) केली होती. भरतीसाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार नोंदणी जुलैमध्ये सुरू होईल. इच्छुक अर्जदारांना भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com