
नवी दिल्ली : संरक्षण साहित्य खरेदीसाठी होत असलेला विलंब चिंताजनक असल्याची टिपणी हवाईदल प्रमुख अमरप्रीतसिंग यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना केली. लष्कर आणि संरक्षण साहित्याचा पुरवठा करणारे उद्योग यांच्यात उत्तम समन्वय आणि पारदर्शकता असणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.