विंग कमांडर विक्रांत उनियाल यांनी एव्हरेस्टवर विनाऑक्सिजन गायले राष्ट्रगीत

विंग कमांडर विक्रांत उनियाल यांचा एव्हरेस्ट शिखरावर राष्ट्रगीत गातानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होतोय
Wg Cdr Vikrant Uniyal Everest
Wg Cdr Vikrant Uniyal Everest sakal

विंग कमांडर विक्रांत उनियाल यांनी एव्हरेस्ट शिखर सर करून तिरंगा फडकावला सोबत एव्हरेस्ट शिखरावर विनाऑक्सिजन मास्क भारताचे राष्ट्रगीत जन गण मन’ हे गायले आहे.माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे .त्याची उंची ८,८४८.८६ मीटर (२९,०३१.६९ फूट) इतकी आहे.

Wg Cdr Vikrant Uniyal Everest
सौरभ गांगुलीचा BCCI अध्यक्षपदाचा राजीनामा; नवी इनिंग करणार सुरू?

विंग कमांडर विक्रांत उनियाल यांनी २१ मे रोजी केवळ एव्हरेस्ट जिंकला नाही, संपूर्ण भारतीयांची मने जिंकली आहे.सोशल मीडियावर अनेकदा देशभक्तीशी विषयी एकापेक्षा एक काळजाला हात घालणारे व्हिडिओ व्हायरल होतात. जे पाहून अनेकदा आपल्याला प्रचंड अभिमान वाटतो. आज आम्ही तुमच्यासोबत असाच एक व्हिडिओ शेअर करणार आहोत, जो पाहून तुम्हालाही अभिमान वाटेल.

Wg Cdr Vikrant Uniyal Everest
राज्यात कोरोनाची रूग्णसंख्या वाढतीच; टोपेंचे मोठं विधान

हा व्हिडिओ आहे प्रयागराजमध्ये तैनात असणारे भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर विक्रांतने २१ मे रोजी एव्हरेस्टवर विजय तर मिळवलाच, पण ऑक्सिजन मास्कशिवाय भारतीय ध्वज फडकावत एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचताना 'जन गण मन' हे राष्ट्रगीतही गायले. एक अनोखा विजय मिळवुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला आहे.

Wg Cdr Vikrant Uniyal Everest
कर्णधार बावुमाचा इशारा; उमरानसारख्यांची गोलंदाजी खेळतच मोठे झालोय

व्हायरल व्हिडिओ असे दिसते की माउंट एव्हरेस्ट चढल्यानंतर विंग कमांडर विक्रांत उनियाल हे एव्हरेस्टवर भारतीय ध्वज फडकवताना दिसतं आहे सोबतच ते भारताचे राष्ट्रगीत देखील गात आहेत. 'प्रत्येक भारतीयाला तुमचा सार्थ अभिमान आहे" असे शिर्षक टाकुन विंग कमांडरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ सगळ्या पहिल्यांदा "संरक्षण पीआरओ प्रयागराज" यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. ऑनलाइन शेअर केल्यानंतर या व्हिडिओला 44.3k व्ह्यू मिळाले आहेत.

Wg Cdr Vikrant Uniyal Everest
चारमिनारमध्ये नमाज पठणाला परवानगी द्या; काँग्रेस नेत्याची मागणी

या छोट्या व्हिडिओ क्लिपमध्ये एक फ्रेम मनाला खुप भावते ती म्हणजे विंग विक्रांत उनियाल आणि त्याच्यांसोबतचे गिर्यारोहकांसोबत राष्ट्रध्वज आणि हवाई दलाचा ध्वज हातात घेत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना विंग कमांडरला असे म्हणताना ऐकू येते की, 'आझादीच्या अमृत महोत्सवानिमित्त आम्ही माउंट एव्हरेस्टवर भारतीय राष्ट्रीय ध्वज आणि वायुसेनेचा ध्वज धरत एक अनोखी मानवंदना देत आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com