युक्रेनच्या फ्लाईटसाठी तासाला ८ लाखांचा खर्च; एका ट्रिपचा खर्च ऐकून व्हाल आवाक्

Air India
Air IndiaSakal

नवी दिल्ली : युक्रेनमधील युद्धपरिस्थितीमुळे तेथील विमानसेवा गुरुवार (ता.२४) फेब्रुवारीपासून खंडित करण्यात आली आहे. त्यामुळे तेथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारद्वारे ड्रीमलाइनर वाइड-बॉडी बोईंग ७८७ ही विमानसेवा सुरु ठेवण्यात आली आहे. ड्रीमलायनरसह चार्टर्ड फ्लाइट चालवण्याचा खर्च प्रति तासाला सात ते आठ लाख रुपये असून प्रवासाला लागणाऱ्या वेळ आणि ठिकाणावर तो अवलंबून असणार आहे. (Russia Ukraine War Crisis News)

Air India
Russia-Ukraine War Live: PM मोदी युक्रेनच्या मुद्द्यावर घेणार उच्चस्तरीय बैठक

सध्या एअर इंडिया बुखारेस्ट (रोमानिया) आणि बुडापेस्ट (हंगेरी) साठी उड्डाणे चालवत आहे. या ड्रीमलाइनर प्रवासी वाहून नेण्याची क्षमता २५० पेक्षा जास्त असून दुहेरी इव्हॅक्युएशन फ्लाइट चालवण्याचा खर्च अंदाजे १.१० कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल. एकूण खर्चामध्ये क्रू, इंधन, नेव्हिगेशन, लँडिंग आणि पार्किंग शुल्काशी संबंधित खर्चाचाह समावेश आहे. विमान दर तासाला सरासरी पाच टन एवढे इंधन वापरते. सध्या ये- जा करणाऱ्या विमानाचा कालावधी सुमारे १४ तासांचा आहे. तसेच हा कालावधी वाढल्यास त्याचा खर्चही वाढणार आहे.

Air India
वळसे पाटलांनी दिली उपोषणस्थळी भेट; संभाजीराजे म्हणतात, 'मी जागा सोडणार...'

सध्या सरकार लोकांकडून निर्वासन उड्डाणांसाठी कोणतेही शुल्क आकारत नाही. याशिवाय काही राज्यांनी युक्रेनमधून परतणाऱ्या आपापल्या राज्यातील लोकांचा खर्च उचलणार असल्याचेही जाहीर केले आहे. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांच्या माहितीनुसार युक्रेन आणि त्याच्या सीमावर्ती भागात १६ हजार भारतीय नागरिक अडकल्याची शक्यता आहे. त्यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांचा समावेश जास्त असून, आतापर्यंत ९०० पेक्षा अधिक नागरिक सुरक्षितपणे भारतात परतले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com