Air India: स्वेच्छानिवृत्तीची मुदत वाढवली, इच्छुक कर्मचारी आता 31 मे पर्यंत करू शकतात अर्ज

एअर इंडिया कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे
Air India
Air IndiaEsakal

एअर इंडियाने सोमवारी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आल्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मे 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

स्वेच्छानिवृत्तीशी संबंधित प्रश्नांसाठी, एअरलाइनने कर्मचाऱ्यांना एचआर विभागाशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सर्व पात्र कर्मचारी 31 मे पर्यंत VRS योजनेची निवड करू शकतात.

एअरलाइनने मार्चमध्ये आपल्या नॉन फ्लाइंग स्टाफसाठी संधी आणली होती. गेल्या वर्षी जानेवारीत तोट्यात चाललेल्या विमान कंपनीचा ताबा घेतल्यानंतर टाटा समूहाची स्टाफसाठी ही दुसरी संधी आहे. एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे की "सर्व पात्र कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मे 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे''. जून 2022 मध्ये, एअर इंडियाने स्वेच्छा निवृत्ती संधीचा पहिला टप्पा सुरू केला.

Air India
Honey Trap : हनी ट्रॅप काय असतो ? उच्चपदस्थ अधिकारी यामध्ये कसे अडकतात ?

पहिल्या टप्प्यात फ्लाइंग आणि नॉन फ्लाइंग स्टाफसाठी ऑफर

स्वैच्छिक सेवानिवृत्ती संधीच्या पहिल्या टप्प्यात, फ्लाइंग आणि नॉन-फ्लाइंग कर्मचा-यांचा समावेश होता. त्यावेळी सुमारे 4,200 कर्मचारी पात्र होते आणि त्यापैकी सुमारे 1,500 जणांनी पुन्हा काम करण्याची निवड केली.

Air India
Lithium Reserves: राजस्थानात सापडला लिथिअमचा मोठा साठा! भारताच्या बॅटरी क्षेत्रात होणार क्रांती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com