
Air India Flight Hijack
ESakal
एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बेंगळुरूहून वाराणसीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एका प्रवाशाने कॉकपिटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. यामुळे आत प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण तयार झाले. या प्रवाशाने विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून आले. मात्र पायलटने दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली आहे.