
Air India Flight Issue: अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाच्या अनेक विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे वृत्त समोर आले आहे. दिल्ली विमानतळावर देखील बुधवारी एक घटना समोर आली. सुमारे १६० प्रवाशांसह मुंबईला येणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान दिल्ली विमानतळावर तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आले. पण एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले की, दिल्लीहून येणाऱ्या विमानाच्या कर्मचाऱ्यांनी किरकोळ तांत्रिक बिघाडानंतर सुरक्षिततेला प्राधान्य देत उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतला.